Eknath Shinde : सभागृह गाजवणाऱ्या ठाकरेंच्या 'या' फायरब्रँड नेत्याला एकनाथ शिंदेंनी दिली खुली ऑफर

Shivsena News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे याच पक्षातील नेत्याच्या भाषणाचे तोंडभरून कौतुक करताना थेट शिवसेनेत प्रवेश करण्याची खुली ऑफरच त्यांनी दिली.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु असताना सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. त्याच मुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे याच पक्षातील नेत्याच्या भाषणाचे तोंडभरून कौतुक करताना थेट शिवसेनेत प्रवेश करण्याची खुली ऑफरच त्यांनी दिली.

शुक्रवारी विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी परखडपणे मते मांडली. यावेळी संधी मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पायऱ्यांवर उभं राहून बघायचा चॅनेलचा बूम आणि ठोकायची धूम, असे म्हणत शिंदेंनी ठाकरेंना डिवचले. विधानपरिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray ) नाव न घेता शिंदेंनी जोरदार हल्लाबोल केला.

Eknath Shinde
Solapur Shivsena : काँग्रेसच्या मुशीत घडलेल्या अन्‌ भाजपतून आलेल्या नेत्यावर शिंदेसेनेच्या सोलापूर शहरप्रमुखपदाची धुरा

त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde )भाषणापूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून सत्ताधाऱ्यावर टीका केली. त्याचवेळी त्यांनी काही मुद्दे मांडत सत्ताधाऱ्या समोरील अडचण वाढवली. त्यांच्या या भाषणानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी खुल्या मनाने दानवेंच्या भाषणाचे कौतुक केले.

Eknath Shinde
Ekanath Shinde : शिंदे सत्तेत आले खरे, पण पक्षाबाबत गाफील राहीले तर....?

यावेळी दानवेंनी इतके मुद्दे मांडले की हे सर्व ऐकून मी प्रभावित झालो आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात त्यांचा विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे येत्या काळात ते सभागृहात नसणार आहेत. त्यामुळेच शिंदेंनी त्यांना यावेळी शिवसेनेत प्रवेश करण्याची सर्वांसमोरच खुली ऑफर दिली आहे. त्याचवेळी त्यांचे विरोधी पक्षनेते म्हणून सभागृहातील हे शेवटचे भाषण असेल, असा गौप्यस्फोट यावेळी त्यांनी केला.

Eknath Shinde
Eknath Shinde : फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा जोरदार धक्का; 'या' महत्त्वाच्या पदावरुन जवळच्या नेत्याला हटवले

त्यामुळे सभागृहातील या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणांनंतर चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे येत्या काळात अंबादास दानवे काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Eknath Shinde
Raju Shetty : 500 कोटींचा घोटाळा झालाच नाही, 'त्या' नेत्याच्या आरोपावर अप्पर पोलिस महासंचालकाचे स्पष्टीकरण; 'सीएम'कडे साकडे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com