Eknath Shinde : फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा जोरदार धक्का; 'या' महत्त्वाच्या पदावरुन जवळच्या नेत्याला हटवले

Fadnavis vs Shinde News : मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांच्या कार्यकाळातील काही निर्णय बदलले असतानाच आता आणखी एक निर्णय बदलून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळच्या नेत्याला धक्का दिला.
Eknath Shinde, Devendra fadnavis
Eknath Shinde, Devendra fadnavis Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. सत्तास्थापन होईपर्यंत महायुतीमध्ये अनेक घडामोडी घडल्या. गेल्या तीन महिन्यात महायुतीमधील छोटे-मोठे रुसवे फुगवे सुरुच आहेत. सरकारस्थापन होऊन स्थिरस्थावर झाले असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी लपून राहिलेली नाही.

महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयांवर चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या काही निर्णयांना स्थगिती दिली. या सगळ्यावरून शिंदे नाराज असतानाच त्यातच आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांच्या कार्यकाळातील काही निर्णय बदलले असतानाच आता आणखी एक निर्णय बदलून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळच्या नेत्याला धक्का दिला.

Eknath Shinde, Devendra fadnavis
Eknath Shinde Decision : अडचणीत सापडलेल्या महायुती सरकारसाठी आणखी एक धक्का; एकनाथ शिंदेंनी अधिवेशनकाळातच घेतला 'हा' मोठा निर्णय

महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या धर्तीवर नीती आयोगासारखा एक आयोग स्थापन केला आहे. महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच मित्र असे त्याचे नाव आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'मित्र'च्या उपाध्यक्षपदी अजय अशर या बिल्डरची नियुक्ती केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदेंना जोरदार धक्का दिला आहे. मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरुन अजय अशर यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी महायुतीमधील समन्वय राखत मित्रपक्ष असलेल्या तीन पक्षातील नेत्यांची नियुक्ती करीत समतोल राखला आहे.

Eknath Shinde, Devendra fadnavis
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी संधी साधली; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर केली राष्ट्रवादीची कोंडी ?

एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेलया अजय अशर यांची ठाण्यातील बडे प्रस्थ म्हणून ओळख आहे. शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या किसननगर मतदारसंघात त्यांनी अनेक कामे केली आहेत. अशर हे काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांचे मित्र होते. मात्र 2000 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सक्रिय झाले.

Eknath Shinde, Devendra fadnavis
harshvardhan sapkal : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा मोठा निर्णय; तापलेल्या बीड जिल्ह्यात करणार पहिल्यांदाच मुक्काम; काय आहे नेमके कारण ?

त्याकाळी शिवसेनेचे नेते दिवंगत आनंद दिघे यांच्यामुळे एकनाथ शिंदे सभागृह नेतेपदी पोहोचले. त्यावेळी अशर यांनी शिंदेंसोबत जवळीक साधली होती. शिंदे आमदार झाल्यानंतर ही जवळीक घट्ट मैत्रीमध्ये बदलली. त्यानंतर ठाण्यातले अनेक महत्त्वाचे प्रकल्प असो वा रिडेव्हलपिंगचे प्रोजेक्ट अशर यांना प्राधान्य मिळण्यास सुरुवात झाली. तर शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी 'मित्र'च्या उपाध्यक्षपदी अजय अशर यांची नियुक्ती केली होती.

Eknath Shinde, Devendra fadnavis
Ajit Pawar : बीडचे नेतृत्व आता कोणाकडे सोपवणार? अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजय अशर यांना मित्र संस्थेच्या नियमित मंडळावरुन हटवले आहे. तर, त्यांच्या जागी महायुतीमधील तीन पक्षांना संधी सामान संधी दिली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर या तीन नेत्यांची नव्याने 'मित्र'च्या उपाध्यक्ष पदावर निवड केली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Eknath Shinde, Devendra fadnavis
Opposition leader : विरोधी पक्षनेतेपदासाठी आंध्र प्रदेशाप्रमाणेच राज्यातील परिस्थिती; चार दशकापूर्वीचा इतिहास काय सांगतो?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com