Maharashtra News: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ; ठाकरे सरकारच्या काळात फडणवीस अन् शिंदेंना तुरुंगात टाकण्याचा मोठा कट उघड

Mahavikas Aaghadi Government :विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेच्या सभागृहात मविआ सरकारच्या काळात घडलेल्या धक्कादायक प्रकरणावरुन गंभीर आरोप केले होते.त्यावेळी दरेकरांनी राजकीय सूडबुद्धीने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप केला होता.
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने अहवालात महाविकास आघाडी सरकारच्या काळात सध्याचे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवत त्यांना थेट तुरुंगात धाडण्याचा मोठा कट रचला गेल्याचा दावा करण्यात आला आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. आता एसआयटीच्या अहवालात अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्यानं पुन्हा एकदा या मुद्द्यांवरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मविआ सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांना अडकवण्याचा कट रचण्यात येत होता. दोघांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र सुरू होतं. ठाणे नगर पोलीस ठाण्यात 2016 मध्ये नोंदवलेल्या एका जुन्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याच्या नावाखाली हा कट रचण्यात आला होता.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी 2016 च्या ULC घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना खोट्या ULC घोटाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता,असा दावा गृहमंत्रालयाकडे सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याच्या निवृत्त पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्य गृह विभागाला सादर केलेल्या विशेष चौकशी अहवालात ही बाब आता समोर आल्यानं ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि महाविकास आघाडीत शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेच्या सभागृहात मविआ सरकारच्या काळात घडलेल्या धक्कादायक प्रकरणावरुन गंभीर आरोप केले होते.त्यावेळी दरेकरांनी राजकीय सूडबुद्धीने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर उद्योगपती संजय पुनमिया यांनीही एक स्टिंग व्हिडिओ समोर आणत मोठी खळबळ उडवून दिली होती.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News: अजित पवार- महेश लांडगे वादात CM फडणवीसांची एन्ट्री; दादांना टोले अन् लाडक्या आमदाराला कानमंत्र

या प्रकरणात आधीच दोषारोपपत्र दाखल झाले असतानाही केवळ राजकीय दबावापोटी पुन्हा चौकशी सुरू करण्यात आली. तपास पथकाने कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये स्टिंग व्हिडिओची तपासणी केली, ज्यात त्यातील संभाषणाची सत्यता सिद्ध झाली आहे. तसेच सरकारी गाडीच्या लॉगबुकची पाने गायब असल्याचे समोर आले असून,हे पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रकार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी विधान परिषदेच्या सभागृहात मविआ सरकारच्या काळात घडलेल्या धक्कादायक प्रकरणावरुन गंभीर आरोप केले होते.त्यावेळी दरेकरांनी राजकीय सूडबुद्धीने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर उद्योगपती संजय पुनमिया यांनीही एक स्टिंग व्हिडिओ समोर आणत मोठी खळबळ उडवून दिली होती.

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Beed Politics: बीडच्या राजकारणात मोठा भूकंप,धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार? अजितदादांच्या सहा सभांना दांडी, फडणवीसांच्या कार्यक्रमाला हजेरी

गृहविभागाला एसआयटीने सादर केलेल्या अहवालात तत्कालीन पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे,तत्कालीन उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि एसीपी सरदार पाटील यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तपासादरम्यान काही साक्षीदारांवर त्यांचे जबाब बदलण्यासाठी आणि शिंदे-फडणवीस यांची नावे गुन्ह्यात जोडण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचेही समोर आले आहे.

गृह विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबईचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या नेतृत्वाखाली 4 सदस्यीय एसआयटी नियुक्त केली होती.या एसआयटीनं केलेल्या तपासात अखेर ठाणे नगर पोलीस ठाण्यात 2016 मध्ये नोंदवलेल्या एका जुन्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याच्या नावाखाली दोन्ही नेत्यांना अडकवण्याचा कट रचण्यात आल्याचा उघड झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com