Devendra Fadnavis News: अजित पवार- महेश लांडगे वादात CM फडणवीसांची एन्ट्री; दादांना टोले अन् लाडक्या आमदाराला कानमंत्र

Ajit Pawar Vs Mahesh Landge Dispute: गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रचारात स्थानिक भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातील वाद पेटल्याचं दिसून आलं होतं.अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर महेश लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करत,आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत,जन्मत:च लंगोट घालणारे आम्ही आहोत,असे म्हणत खुलं आव्हान दिलं होतं.
Devendra Fadnavis Ajit Pawar Mahesh Landge
Devendra Fadnavis Ajit Pawar Mahesh Landge Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchad News: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मनात नेहमीच एक सल कायम राहिली आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे बोलूनही दाखवल्याचं दिसून आलं आहे. एवढी विकासाची कामे करुनही पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नागरिकांनी का नाकारलं. आता अजितदादांनी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी जोर लावला आहे.

यावेळी त्यांनी कशाचीही पर्वा न करता थेट राज्याच्या सत्तेत एकत्र नांदत असलेल्या महायुतीती मित्रपक्ष भाजपवरही गंभीर आरोप केले आहेत. यात भोसरीचे आमदार महेश लांडगेंना टार्गेट केलं आहे. लांडगेंनीही अजितदादांवर जशास तसा पलटवार केला आहे. आता अजितदादा विरुद्ध लांडगे वादात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची एन्ट्री झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप आमदार महेश लांडगे अन् राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यातील पेटलेल्या वादात उडी घेतली आहे.ते म्हणाले, आपलं काम बोलतंय,त्यामुळे हा वैताग,त्रागा आणि रागाराग आहे. पण महेशदादा जरा समजून घ्या,ते रागावले म्हणून तुम्ही रागावू नका.त्यांना सांगायला काम नाही. त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्यांच्याकडे उत्तरं नाहीत.याचमुळे त्यांना आरोप-प्रत्यारोपात ही निवडणूक गुंतवून ठेवायची असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी महेश लांडगेंना महत्त्वपूर्ण सल्लाही दिला. ते म्हणाले,आपण विकासाच्या मुद्यांवर बोलत राहायला हवं. म्हणजे,आरोप-प्रत्यारोप करत बसण्याची वेळच येणार नाही. महेशदादा तुम्ही टीका करु नका,फक्त आपण केलेल्या कामांची आठवण करुन द्या. म्हणजे, दादा टीका करण्याची गरज पडणार नाही, असा सल्लाच फडणवीसांनी महेश लांडगेंना दिला.

Devendra Fadnavis Ajit Pawar Mahesh Landge
Beed Politics: बीडच्या राजकारणात मोठा भूकंप,धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार? अजितदादांच्या सहा सभांना दांडी, फडणवीसांच्या कार्यक्रमाला हजेरी

'परिंदे को मिलेगी मंजिल एकदिन,ये उनके फैले हुये पंख बोलते है!और वही लोग जो खामोश रहते है,अक्सर जमाने मे जिनके हुनर बोलते है! या शेरोशायरीतून फडणवीसांनी जोरदार फटकेबाजी केली. ते म्हणाले, आमचे महेश लांडगे जरा वैतागले होते,कारण निवडणुका आल्या की, अनेकांना कंठ फुटतो.अनेकजण आरोप करत आहेत.एकमात्र मी सांगू इच्छितो की,याठिकाणी आपलं काम बोलतंय.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेरोशायरीतून टोला लगावला.फडणवीसांच्या टोलेबाजीनंतर आणि भाजप आमदार महेश लांडगेंना दिलेल्या सबुरीच्या सल्ल्यानंतर पिंपरी चिंचवडचं राजकीय वादावर पडदा पडणार की धग कायम राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Devendra Fadnavis Ajit Pawar Mahesh Landge
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे निवडणुकीच्या आधीच मोठे संकेत; म्हणाले, '...तर फडणवीसांसाठी 'मातोश्री'चे दरवाजे पुन्हा उघडतील!'

गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील प्रचारात स्थानिक भाजप आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यातील वाद पेटल्याचं दिसून आलं होतं.अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर महेश लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी भाषेत उल्लेख करत,आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत,जन्मत:च लंगोट घालणारे आम्ही आहोत,असे म्हणत खुलं आव्हान दिलं होतं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेत आमदार महेश लांडगेंवर नाव न घेता निशाणा साधला होता. भ्रष्टाचाऱ्याच्या आकाला संपवायचे आहे, असे म्हणत रिंग करून महापालिकेत भ्रष्टाचार केला जात असल्याचे ते म्हणाले होते. अजित पवारांच्या या आरोपानंतर महेश लांडगे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Devendra Fadnavis Ajit Pawar Mahesh Landge
Ashok Chavan News : मी इथेच जन्मलो, इथेच मरणार; अशोक चव्हाण नांदेडमुक्त होऊच शकत नाही!

महेश लांडगे म्हणाले,ज्या महापालिकेत कधी काळी आपण कारभारी होते. त्या महापालिकेत 128 जागांवर उमेदवार देऊ शकलो नाही याचे नैराश्य अजित पवारांना आहे. ज्या पक्षाकडे कधीकाळी उमेदवारी घेण्यासाठी फार इच्छुक असायचे त्या पक्षाला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत. अजित पवारांची आरोप करण्याची जी सवय आहे आत्ताची नाही. मी राजकारण आलोय तेव्हापासून बघतोय निवडणूक आली की आरोप करायचे, याशिवाय त्यांना काही जमलं नाही.

भाजप आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांवर शाब्दिक हल्ले चढवले. विकासावर बोला, एवढे दिवस पालकमंत्री म्हणून तुम्ही काम केलं तरी देखील तुम्ही आरोपच करणार का? ते पण खोटे आरोप.', असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी आधी आपल्या लेकाचं बघा काय झालं ते, भाजपसोबत आल्याने तुम्हाला तुमचे गुन्हे लपवता येणार नाही. तुम्ही आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा, असा सल्ला देखील अजित पवारांना दिला. तसेच ते अस्वस्थ झाले आहेत. कारण त्यांना 128 उमेदवार उभे करता आले नाहीत, असा टोलाही लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com