Maharashtra Political News : मागील वर्षी जून महिन्यात राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. यात शिंदेसह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र, तेव्हापासून ते आजतागायत ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातून विस्तवही जात नाहीत. दोन्ही गटाच्या नेतेमंडळींकडून एकमेकांबाबत आरोप प्रत्यारोपांच्या फैरींसह अनेक गौप्यस्फोटही केले जात आहेत.
आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत(Arvind Sawant) यांना मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाला होता. या गौप्यस्फोटानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातला संघर्ष पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी २०१९ साली महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळचा संदर्भ देत मोठं विधान केलं आहे. सावंत म्हणाले, २०१९ रोजी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी उध्दव ठाकरें(Uddhav Thackeray)नी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचंच नाव दिलं होतं.
पण शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असा सवाल उपस्थित केला होता.
तसेच असं असूनही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं. पण शरद पवारां(Sharad Pawar)नी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी गळ घातली. आणि हे शिवधनुष्य तुम्हांलाच घ्यावं लागेल असं शरद पवार म्हणाले असा धक्कादायक खुलासा खासदार सावंत यांनी केला आहे. आता सावंत यांच्या दाव्यानंतर शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीआधी भाजपात जाणार..
छत्रपती संभाजीनगरमधील महाविकास आघाडीची सभा ही वज्रमूठ नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंची मजा घेण्यासाठी मंचावर बसले होते. तसेच काँग्रेसमध्येच एकवाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही असा आरोप शिंदे गटाचे नेते व आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
यावेळी त्यांनी अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील. कारण एवढ्या मोठ्या नेत्याला तिथं योग्य वागणूक मिळत नाही असं एकंदर दिसत आहे असं धक्कादायक विधान आमदार शिरसाट यांनी केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.