Uddhav Thackeray: विरोधी पक्षनेतेपदासाठी टाळाटाळ, ठाकरेंनी नार्वेकर,शिंदेंनाच गाठलं; भाजपला करुन दिली केजरीवालांच्या 'मोठेपणा'ची आठवण

Assembly Winter Session: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदावरुन महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरलं. त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. माजी मुख्यमंत्री अन् शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीबाबत जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी महत्त्वपूर्ण भेटीगाठी घेतल्या.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत त्याच्यासोबत केलेल्या सुमारे अर्धा तासांच्या चर्चेनंतर त्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचीही भेट घेतली. दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेते नियुक्त करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

याचवेळी त्यांनी विरोधी पक्षनेतेपद देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महायुती सरकार विशेषत: भाजपला (BJP) दिल्लीतील अरविंद केजरीवालांच्या मोठेपणाची आठवण करुन दिली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदावरुन महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरलं. त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जर विरोधी पक्षनेतेपद दिले जात नसेल,तर उपमुख्यमंत्री पदेही रद्द करावीत, अशी ठोस भूमिका मांडली.

उद्धव ठाकरे म्हणाले, जर विरोधी पक्षनेतेपद द्यायचे नसेल तर उपमुख्यमंत्री पदाचीही संविधानात तरतूद नाही, त्यामुळे ती दोन्ही पदंही रद्द करा.दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारचं उदाहरण देत, अरविंद केजरीवालांनी दिल्ली विधानसभेत अवघे 3 सदस्यसंख्या असतानाही भाजपला विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं,त्यामुळे महाराष्ट्राती विरोधी पक्षनेत्याची निवड व्हायलाच हवी,अशी आठवण करुन देतानाच उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला खोचक टोला लगावला.

Uddhav Thackeray
Shivraj Patil Chakurkar : ...अन् मित्राच्या मुलीला सून म्हणून घरात आणलं: शिवराज पाटलांनी जपली राजकारणापलीकडची मैत्री!

दिल्लीच्या विधानसभेत 70 पैकी केवळ 3 जागा भाजपने जिंकल्या असतानाही आम आदमी पक्षाने भाजपला विरोधी पक्षनेतेपद दिले होते. त्यावेळी संख्याबळ नसताना सुद्धा भाजपने ते स्वीकारलं होतं, असा राजकीय आठवण उद्धव ठाकरेंनी भाजपला करुन दिली. विरोधी पक्षाचे नाव तुम्ही नाही ठरवायचं, भाषण काय करायचं, ते मी ठरवणार असल्याचंही त्यांनी ठणकावलं.

Uddhav Thackeray
PMC elections : पुण्यात काँग्रेस आपला हट्ट सोडणार नाहीच, एकीकडे 'आघाडी'साठी 'हात' पुढे, तर दुसरीकडे 'स्वबळा'साठी हालचाली

उद्धव ठाकरे यांनी यावेळी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही,हे इतिहासमध्ये पहिल्यांदाच होत असल्याचं सांगितलं. तसेच आम्ही भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र दिले होते, अद्याप त्यावर निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री म्हणाले, हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. त्यामुळे,आम्ही अध्यक्षांकडे मागणी केली आहे, त्यासोबतच विधानपरिष सभापती यांनासुद्धा भेटलो. त्यावर,आम्ही लवकरच निर्णय घेऊ, आमच्या विचारात हा निर्णय आहे,असे त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com