Narayan Rane : नाचता येईना अंगण वाकडे..! विजयी मेळाव्यावरून नारायण राणे ठाकरेंवर बरसले

Hindi Imposition Policy Withdrawn: Political Fallout : भाजप नेते खासदार नारायण राणे यांनीही या सभेवरून टीका केली आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही प्रश्नांची सरबत्ती करत टोला लगावला आहे.
uddhav thackeray raj thackeray narayan rane
uddhav thackeray raj thackeray narayan ranesarkarnama
Published on
Updated on

Narayan Rane’s Strong Reaction Against the Rally : हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर राज्य सरकारने रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी विजयी सभेची घोषणा केली आहे. सक्तीविरोधातील मोर्चाऐवजी 5 तारखेलाच ही विजयी सभा होणार आहे. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येणारच, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यावरून आता विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे.

भाजप नेते खासदार नारायण राणे यांनीही या सभेवरून टीका केली आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंवरही प्रश्नांची सरबत्ती करत टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांचे मराठीचे प्रेम बेगडी, राजकीय व स्वार्थापोटी असल्याची टीका राणेंनी सोशल मीडियातून केली आहे. मुख्यमंत्री असताना हे प्रेम कुठे गेले होते, असे सवाल त्यांनी केला आहे.

मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले? मराठीच्या नावावर केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी 18 टक्क्यांपर्यंत खाली आली, याला जबाबदारी कोण? मराठी बद्दल इतके प्रेम होते तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले?, असे प्रश्न राणेंनी उद्धव ठाकरेंना केले आहेत.  

uddhav thackeray raj thackeray narayan rane
Raj Thackeray News : काही झाले तरी ठाकरे बंधू एकत्र येणारच! राऊतांच्या फोननंतर राज ठाकरेंकडून शिक्कामोर्तब

सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे, असेच म्हणावे लागेल, असा टोलाही नारायण राणेंनी दोन्ही ठाकरेंना लगावला आहे. दरम्यान, हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता. त्याआधीच रविवारी सरकारने दोन्ही जीआर रद्द केल्याने हा मोर्चाही रद्द करण्यात आला. पण त्याऐवजी आता विजयी सभा घेतली जाणार आहे.

uddhav thackeray raj thackeray narayan rane
Shivsena UBT : शिवसेनेत नाराजीचा स्फोट; आदित्य ठाकरेंकडून अवहेलना; हर्षल सुर्वेंचा उद्धव ठाकरेंना रामराम

राज्य सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या समितीचा अहवाला काहीही आला तरी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी शिकवण्याचा निर्णय होऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी सोमवारी पत्रकार परिषदेतून दिला आहे. मराठीशी तडजोड खपवून घेणार नाही, असा इशारा ठाकरेंनी दिला आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com