लवकर बरे होवून उद्धव ठाकरे पुन्हा राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हावेत...

सिद्धीविनायक चरणी प्रार्थना...
Cm Uddhav Thackeray
Cm Uddhav ThackerayCMO Maharashtara/ Twitter
Published on
Updated on

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. त्यापुर्वी ममता बॅनर्जी यांनी राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. या भेटीवर बोलताना संजय राऊत यांनी बंगालची वाघीण म्हणत ममता दिदींच कौतूक केले.

संजय राऊत म्हणाले, बंगालच्या वाघीण श्रीमती ममता दीदी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा जरी शासकीय कामांसाठी असला तरी त्या मुंबईत आल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांच्या प्रमुख व्यक्तींची भेट घेतात. काल त्यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली. यात चांगली कौटुंबिक आणि राजकीय चर्चा केली. आदित्य ठाकरेंनी ममता दिदींना महाराष्ट्रातील किल्ल्यांचे एरियल फोटो भेट दिले. तसेच ममता दिदींनीही ठाकरेंना काही भेटवस्तू दिल्या. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लवकर बरे होवून पुन्हा राष्ट्रीय राजकारणात परतावे अशी प्रार्थनाही त्यांनी सिद्धीविनायक चरणी केली असल्याचे सांगितले.

Cm Uddhav Thackeray
एसटी आंदोलनातून बाहेर पडलेले पडळकर MPSC विद्यार्थ्यांसाठी कडाडले...

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी यांच्यामाध्यमातून भाजपचे विरोधी पक्षाची सरकार असलेल्या राज्यांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारचे महान कार्य भाजप पश्चिम बंगालमध्ये देखील करत आहेत असे दिदी म्हणाल्या, पण त्या त्यांना पुरून उरल्या आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुद्धा या दहशतवाद्यांशी सामना करेल. मराठा आणि बांगला "जय मराठा आणि जय बांगला" हे दोन्ही राष्ट्र अन्याय आणि असत्याशी एकत्र लढतील असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

ममता बॅनर्जी-शरद पवार भेट

संजय राऊत यांनी आजच्या ममता बॅनर्जी-शरद पवार भेटीवरही भाष्य केले. ते म्हणाले, ममता बॅनर्जी या खूप मोठ्या नेत्या आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी पश्चिम बंगालमध्ये एखाद्या वाघिणीसारखी झुंज दिली आणि सगळ्या लांडग्यांना पळवून लावले हे पाहता संपूर्ण देश आज त्यांच्याकडे प्रमुक नेत्या म्हणून पाहत आहे. जोडीला आणखी काही ज्या प्रमुख नेत्यांकडे देश पाहतो, त्यांच्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, शरद पवार आहेत. त्यामुळे शरद पवार यांची भेट ही देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे ममतादिदी जर पवारांना भेटीत असतील तर ते नक्कीच स्वागतहार्य आहे

Cm Uddhav Thackeray
वानखेडेंचं जात प्रमाणपत्र खरं की खोटं? समितीनं बजावलं समन्स

सर्वांना एकत्र घेवूनच जावे लागेल...

पश्चिम बंगालमध्ये डावे भुईसपाट झाले आहेत. काँग्रेसचा देखील अस्तित्व राहिलेले नाही. भाजपचे बँड-बाजा पथक आले होते, त्यांची हवा ममतादिदींनी काढून घेतली आणि ऐतिहासिक असा विजय मिळवला. यानंतर जे भाजपा सोबत गेले त्यांच्यातही फाटाफूट झाली आणि ते पुन्हा ममतादिंदीकडे वळले. आता काँग्रेस बंगालमध्ये नाही, पण त्या मुळच्या काँग्रेसच्याच आहेत. आता राष्ट्रीय पातळीवर जो वाद आहे तो ममतादिदी आणि काँग्रेसचा वाद आहे. परंतु एक समर्थ अशी आघाडी उभी करायची असेल तर सर्वांना एकत्र घेऊन जावे लागेल, असेही मत संजय राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com