वानखेडेंचं जात प्रमाणपत्र खरं की खोटं? समितीनं बजावलं समन्स

वानखेडे यांनी खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.
Sameer Wankhede
Sameer Wankhede sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एनसीबीचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या जात प्रमाणपत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab malik) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वानखेडे यांनी जातीचं खोटं प्रमाणपत्र (Caste Certificate) देत नोकरी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यानंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याबाबत तक्रारी आल्या आहेत. या तक्रांरीवरील सुनावणीला आता वेग आला असून खुद्द वानखेडे यांना हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलं आहे.

मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे मंगळवारी वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरील तक्रारीची सुनावणी झाली. मनोज संसारे आणि अशोक कांबळे यांनी समितीकडे तक्रार केली आहे. या दोघांनाही मंगळवारी सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते. पण ते अनुपस्थित होते. त्यांच्यावतीने अॅड. नितीन सातपुते यांनी बाजू मांडली. त्यांनी अशोक कांबळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली तक्रार, वानकेखे यांचा बृहन मुंबई कार्यकारी न्यायदंडाधिकारींनी दिलेला जातीचा दाखला आणि जन्मदाखल्याची प्रत समितीसमोर सादर केली.

Sameer Wankhede
रांगोळी, तोरणे सर्वच व्यर्थ...तयारी वाया गेली! मेधा कुलकर्णी नाराज

सातपुते आणि तक्रारीच्या अनुषंगाने अधिकचे पुरावे पुढील सुनावणीच्या आधी समितीसमोर सादर करणार असल्याचे सांगितले आहे. आता पुढील सुनावणी 14 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. यादिवशी वानखेडे यांनी उपस्थित राहण्याचे आदेश समितीने दिले आहेत. त्यामुळे आता वानखेडे यांना समितीसमोर आपली बाजू मांडावी लागणार आहे. समितीच्या कामकाजाला वेग आल्याने लवकरच वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र खरं की खोटं यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मलिक यांनी वानखेडे यांच्या मुंबईतील प्राथमिक शाळेचे दोन दाखले सोशल मीडियात व्हायरल केले आहेत. या दोन्ही दाखल्यांवर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद आणि धर्म मुस्लिम असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आणि वडिलांचे नाव दाऊद असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

Sameer Wankhede
शरद पवारांना भेटण्यापूर्वीच ममता बॅनर्जींना मोठा झटका

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मलिक यांनी उच्च न्यायालयात (High Court) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. वानखेडेंचा शाळेचा प्रवेश अर्ज आणि शाळा सोडल्याचा दाखला याचीही कागदपत्रे मलिक यांनी दिली आहेत. हे दाखले सोशल मीडियातही व्हायरल झाले आहेत. या दोन्ही कागदपत्रांमध्ये वानखेडे हे मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे.

दोन्ही दाखल्यांवर वानखेडे यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असे आहे. तसेच धर्माच्या रकान्यातही मुस्लिम असे लिहिल्याचे दिसते. समीर वानखेडे सेंट जोसेफ हायस्कुल वडाळा इथे पहिली ते चौथी शिक्षण झाले आहे. ही शाळा सोडल्याचा 1989 चा दाखला समोर आला आहे. सेंट पॉल शाळेतून घर बदलल्यानंतर वानखेडे यांनी घेतलेल्या शाळा सोडण्याच्या दाखल्यातही समीर दाऊद वानखडे नाव आणि धर्म मुस्लिम असल्याचे नमूद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com