Mumbai News : देशभरात 22 जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे. मात्र या सोहळ्याला ते उपस्थित राहणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.
22 तारखेला राम राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आले आहे, मात्र ते या सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत, हे त्यांनी स्वतः स्पष्ट केले आहे. 23 जानेवारीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे शिबिर हे नाशिकला होणार आहे.
22 जानेवारीला नाशिकमध्ये ज्या मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांना जाण्यासाठी संघर्ष करायला लागला. त्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाणार आहे. त्याचं संध्याकाळी गोदातीरी महाआरतीदेखील केली जाणार आहे. शिवसैनिकांकडून 22 जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा हा नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे. केवळ या कारणासाठी अयोध्येला जात नसल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
या सगळ्यात राजकीय रंग नको, हा सोहळा खूप महत्त्वाचा आहे आणि यात कुठलंही राजकारण आणायला नको. ज्यावेळेला आम्हाला वाटेल त्यावेळेला आम्ही अयोध्येला जाऊन रामाचे दर्शन घेऊ, असेदेखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.
23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये शिवसेनेचे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर नाशिक येथे संध्याकाळी जाहीर सभादेखील होणार आहे. या सभेदरम्यान उद्धव ठाकरे नेमकं कोणावर बोट ठेवतात आणि कोणावर ताशेरे ओढतील, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.
राज्यातल्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले जाईलच, मात्र त्याव्यतिरिक्त अन्य कोणत्या विषयांवर भाष्य केलं जाईल, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनाने ही सभादेखील तितकीच महत्त्वाची आहे, त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
(Edited by Sachin Waghmare)
R...