Yavatmal : आमदार भोंडेकरांनी पळण्याऐवजी मदत केली असती, तर एक जीव वाचला असता!

Narendra Bhondekar : अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्र्यांच्या शिलेदारांची टोकाची असंवेदनशीलता
Accident To MLA Narendra Bhondekar.
Accident To MLA Narendra Bhondekar.Sarkarnama
Published on
Updated on

Insensitivity Of Public Representative : भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यातील ‘एस्कॉर्टिंग’ वाहनाला ऑटो व दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला आहे. आठ जण अपघातात गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी (ता. 5) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसजवळ घडलेल्या या अपघातानंतर आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा अत्यंत असंवेदशनशीलपणा उघडकीस आला आहे.

अपघातानंतर जखमींना मदत न करणे तर दूरच, त्यांची साधी विचारपूसही न करता आमदार भोंडेकर आपल्या वाहनाने घटनास्थळावरून पोलिसांना सोडत पळून गेले. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आमदार भोंडेकर यांना रुग्णवाहिकेची प्रतीक्षा न करता पोलिसांच्या मदतीने जखमींना आपल्या वाहनातून रुग्णालयात नेता आले असते. परंतु भोंडेकर या सर्वांना वाऱ्यावर सोडून निघून गेले. पोलिसांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली.

Accident To MLA Narendra Bhondekar.
Yavatmal : ‘वाय’ सुरक्षा असलेल्या आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या ताफ्यातील अपघातावर शंकांचे वलय!

आमदार भोंडेकर यांना ‘वाय’ दर्जाची पोलिस सुरक्षा आहे. जे पोलिस दिवसरात्र आमदारसाहेबांच्या सुरक्षेसाठी राबत होते, त्यांच्याकडेही आमदारमहोदयांनी भंडारा पोहोचेपर्यंत व पोहोचल्यानंतर वळूनही पाहिले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत संवेदनशील नेता म्हणून ओळखले जातात. नागपूर येथील बाजारगावला भेट द्यायला आले असताना मुख्यमंत्री शिंदे यांना जवळच एक अपघात घडल्याचे कळले. त्यांनी ताफा त्या दिशेने वळवत जखमीला तातडीने नागपुरातील रविनगर चौकात असलेल्या सेनगुप्ता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जोपर्यंत जखमीला उपचार मिळाले नाहीत, तोपर्यंत शिंदेंनी हॉस्पिटल सोडले नव्हते.

संवेदनशील मुख्यमंत्र्यांचे शिलेदार मात्र अत्यंत असंवेदनशील निघाल्याचा संताप नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या कृतीतून दिसत आहे. या अपघातातील जखमींना तातडीने भोंडेकर यांनी रुग्णालयात पोहोचविले असते, तर कदाचित एकाचे प्राण वाचले असते. भोंडेकर यांच्या ताफ्यातील पोलिस वाहन क्रमांक MH30-2272 वर समोरून येणारा ऑटो क्रमांक MH29-W-9075 आणि दुचाकी क्रमांक MH37-Y-6564 धडकले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अपघातात दुचाकीवरील गजानन जकाते (वय 50, रा. दिग्रस), उमेश राजू मनवर (वय 30, रा. चिंचोली) हे गंभीर जखमी झाले. त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. गजानन जकाते यांचा यात मृत्यू झाला. ऑटोमधील सय्यद जावेद सय्यद ताजुद्दीन (वय 38), सलमा परवीन (वय 24), अफसानाबी मोहम्मद जमीर (वय 60), प्रतीक ब्रह्मा मोरे (वय 20), सुरेखा गजानन बोरकर (वय 30), अनसखान वाजिदखान (वय 12), तोहिद खान वाजिद खान (वय 8, सर्व रा. मोतीनगर, दिग्रस) हे जखमी झाले. जखमींवर दिग्रस ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची घटना घडल्यानंतर ताफ्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलिस, रुग्णवाहिकेचा पाचारण केले. तोपर्यंत जखमी रस्त्यावरच पडून होते. परंतु आमदार भोंडेकर यांनी जखमींना पोलिसांच्या मदतीने आपल्या वाहनातून रुग्णालयात नेले नाही व ते अपघातस्थळावरून निघून गेलेत. अतिरिक्त पोलिस ताफा व रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहोचायला बराच वेळ लागला. त्यामुळे जखमींचा रक्तस्त्राव बऱ्यापैकी झाला. यात गजानन यांना प्राण गमवावे लागले.

Accident To MLA Narendra Bhondekar.
CM Eknath Shinde News : संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला मुख्यमंत्री धावले; ताफ्यातील रुग्णवाहिका दिलीच शिवाय...

भोंडेकर यांच्या ताफ्यातील एका पोलिस वाहनाला अपघात झाला होता. आमदारांचे स्वत:चे वाहन व त्यांच्या ताफ्यातील पोलिस ‘पायलटिंग कार’ पूर्णपणे सुस्थितीत होती. त्यातून जखमींना सायरन वाजवत नेता आले असते. परंतु भोंडेकरांनी ही संवेदनशीलता दाखविली नाही. उलट पोलिसांच्या वाहनावरील सायरन वाजवायला लावत ते स्वत: भंडारा येथील आपल्या निवासस्थानी रात्री दाखल झाले. संपूर्ण रात्रभर आराम फर्मावत त्यांनी शनिवारी (ता. 6) आपली दिनचर्या सुरू ठेवली.

आमदार म्हणून भोंडेकर यांनी आमच्या व जखमींच्या मदतीसाठी धावाधाव करायला हवी होती, असे त्यांच्याच ताफ्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी आता बोलत आहेत. आमदारांनी हिंमत दाखवायला हवी होती, असेही त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे भंडाऱ्यात भोंडेकर हे स्वत: रुग्णालय संचालित करतात, अशी माहिती आहे. रुग्णालयात येणाऱ्यांच्या वेदना काय असतात हे त्यांनी कदाचित जवळून पाहिले असावे. अशातही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना पाहून आमदार भोंडेकर यांच्यातील माणुसकीची भावना कशी जागृत झाली नाही, याबद्दल कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Accident To MLA Narendra Bhondekar.
राज्यमंत्री भरणेंनी जखमीला गाडी दिली अन्‌ स्वतः दुचाकीवरून घरी गेले 

लोकप्रतिनिधींच्या संस्कृतीला हरताळ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात दाखविलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदार बच्चू कडू, आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे अशा अनेकांनी अपघातातील जखमींना मदत केली आहे. इतकेच काय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णवाहिकेला मार्ग देण्यासाठी आपला ताफाही थांबविला होता. हे सर्व माहिती असतानाही आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलता आणि मदतीला धावून जाण्याच्या संस्कृतीला हरताळ फासल्याची चर्चा जनसामान्यांसह राजकीय वर्तुळात आहे.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Accident To MLA Narendra Bhondekar.
Nagpur News : मुख्यमंत्री शिंदेंनी वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण; आपला ताफा थांबवत...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com