

Mumbai News : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सहा खासदारांबाबत मोठा निर्णय घेतला. या सहा खासदाराच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला त्यांनी मंजुरी दिली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या निर्णयामुळे आक्रमक झालेल्या नेत्यांनी आता मोठे पाऊल उचलले आहे. या पुढची राजकीय लढाई पेटणार असून फुटून गेल्या सहा खासदारांच्या विरोधात आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी आरपारची लढाई लढत त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शनिवारी या सहा खासदाराच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील (Shivsena) विलीनीकरणाला मंजुरी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया देण्यात आली. लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य करत या खासदारांना गंभीर इशारा दिला आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, ‘कोणताही सदस्य विलिनीकरण करत नाही. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित कायदेशीर आधार नाही. याबाबत शिवसेना कायदेशीर लढाई निश्चित लढली जाईल. लोकसभा अध्यक्षांना याबाबत पत्र देण्यात आले होते, त्या पत्राला उत्तर देण्यात आले का ? याबाबत प्रश्न विचारला असता दानवे म्हणाले की, उत्तर मिळालेलं नाही. म्हणजे लोकशाही, नियम, कायदे गोंधळून ठेवले जात आहेत. त्यामुळे नियम आणि कायदे बनवले तरी कशाला. आम्ही निश्चितच कायदेशीर लढाई लढणार आहोत. त्यांना असे थोडीच सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे 9 खासदार निवडून आले होते, मात्र आता 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर फक्त 3 खासदार उरले आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे लोकसभेतील संख्याबळ कमी झाले आहे.
त्यामुळे आता येत्या काळात लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयामुळे आक्रमक झालेल्या नेत्यांनी आता मोठे पाऊल उचलले आहे. या पुढची राजकीय लढाई पेटणार असून फुटून गेल्या सहा खासदारांच्या विरोधात आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी आरपारची लढाई लढत त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्वांचे त्याकडे लाख लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.