Sanjay Shirsat On Shivsena UBT : एकनाथ शिंदेंनी एक इशारा केला तर उद्धव सेनेचे सगळे आमदार आमच्याकडे येतील!

Sanjay Shirsat claims that Uddhav Thackeray's MLAs are in contact with them and may join their party at any time. : माझे विरोधक म्हणतात 'ढाई साल के बाद देखेंगे'पण मी आता पाच वर्षे हटत नसतो, असा टोलाही संजय शिरसाट यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना नाव न घेता लगावला.
Uddhav Thackeray, Sanjay Shirsat, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Sanjay Shirsat, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असा अपप्रचार करत निवडून आलेल्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत मात्र आम्ही रोखले. लोकसभेला झालेली चूक मतदारांच्या लक्षात आली आणि त्यांनी महायुतीला भरभरून मतदान केले. आज महाविकास आघाडीतील तीनही पक्षांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की, त्यांना विरोधी पक्ष नेताही करता येत नाहीये.

उद्धव सेनेत आता कोणी थांबायला तयार नाही, 96 जागा लढवणाऱ्या उद्धव सेनेच्या 20 जागा निवडून आल्या. जे निवडून आले तेही आमच्या संपर्कात आहेत, एकनाथ शिंदेंनी फक्त इशारा केला तर ते केव्हाही आमच्याकडे येतील, असा दावा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी परभणीत केला. राजकारणात संयम महत्त्वाचा असतो, मी संयम बाळगला म्हणून मंत्री आणि आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री झालो.

माझे विरोधक म्हणतात 'ढाई साल के बाद देखेंगे'पण मी आता पाच वर्षे हटत नसतो, असा टोलाही संजय शिरसाट यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांना नाव न घेता लगावला. शिवसेना शिंदे गटाचे सईद खान यांच्या पाथरी मतदारसंघात आयोजित कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी केलेल्या भाषणात सईद खान यांना पाहिजे ती मदत करण्याचे आश्वासन दिले. पण तुला आमदार करण्याचा अधिकार मला नाही ते (Eknath Shinde) एकनाथ शिंदे साहेबच करू शकतील, असे सांगत संयम बाळगण्याचा सल्ला दिला.

Uddhav Thackeray, Sanjay Shirsat, Eknath Shinde
Sanjay Shirsat : पालकमंत्री संजय शिरसाट पहिल्याच डीपीडीसीत अब्दुल सत्तारांना दणका देणार!

एकनाथ शिंदे यांनी एकदा ठरवलं की ते केल्याशिवाय थांबत नाहीत. लोकसभेला जेव्हा शिवसेनेचा मंत्री करण्याची वेळ आली तेव्हा सगळ्यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना मंत्री करा, अशी मागणी त्यांच्याकडे केली. पण त्यांनी स्वत:च्या मुलाला मंत्री न करता खासदार प्रताप जाधव यांना मंत्री केले. इकडे मात्र स्वत: मुख्यमंत्री आणि मुलगा मंत्री असा कारभार होता, असा टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला.

Uddhav Thackeray, Sanjay Shirsat, Eknath Shinde
Uddhav Thackeray News : उद्धवजी, शिवसैनिकांना तुम्ही फक्त भाषण, टाळ्या अन् शाब्दिक टोलेबाजीपुरतेच नकोय; तर...

मी साधा रिक्षा चालक होतो, रिक्षाचालक ते मंत्रीपदाचा प्रवास सोपा नव्हता. राजकारणात संयम फार महत्त्वाचा असतो याचा पुनरुच्चार करत परभणी आणि पाथरीसाठी काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही संजय शिरसाट यांनी दिली. ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला या पदावर बसवलं त्या बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष यांनी विकायला काढला होता, त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला, असेही संजय शिरसाट म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com