Shivsena UBT Politics : नाशिक शहर खड्ड्यांचे, ठाकरेंच्या शिलेदारांचे आगळंवेगळं आंदोलन! महापालिकेलाही दिला "हा" इशारा...

Potholes in Nashik Rode : शहरातील सर्व रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्या विरोधात शिवसेनेनं अल्टिमेटम दिला. त्यानंतर महापालिकेने महापालिकेनं चार दिवसात खड्डे बुजवण्याची खात्री दिली आहे.
Shivsena UBT Politics on Potholes in Nashik Rode
Shivsena UBT Politics on Potholes in Nashik Rodesarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : शहरातील सर्व रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्या विरोधात शिवसेनेनं (ठाकरे पक्ष) "सेल्फी विथ खड्डा" असे आंदोलन सुरू केले आहे. आज या पदाधिकाऱ्यांनी थेट महापालिकेच्या आयुक्त कार्यालयावर धडक मारली. शहरातील खड्डे आणि रस्त्यांची दुरावस्था थेट विधानसभेत चर्चेला आली होती. सत्ताधारी भाजपने यावर महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. या अनुषंगाने आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानेही या प्रश्नात पुढे घेतली आहे. (Shiv Sena Thackeray office bearers' angry question to Nashik Municipal Corporation, which has become a city of potholes)

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सेल्फी विथ खड्डा हे आंदोलन सुरू केले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो थेट महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड केले जात आहेत. शहरातील सर्व प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था खड्ड्यांमुळे झाली आहे. यावर महापालिका मात्र उदासीन असल्याचे चित्र आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नायर यांना आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या प्रश्नावर चांगलेच धारेवर धरले. शहरातील सुस्थितीतील रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी सध्याची स्थिती आहे. पालिकेने विविध कंत्राटदारांना खड्डे बुजवण्यासाठी 17 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी कोणाला दिला, त्याची तपासणी झाली होती का? त्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

Shivsena UBT Politics on Potholes in Nashik Rode
Shivsena UBT-MNS : ठाकरे बंधुंच्या युतीच्या आधीच शिवसेनेसह महायुतीला धक्का देण्याची तयारी? तळकोकणात मनसे-शिवसेनेत गुप्त बैठका

कोट्यावधी रुपये रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी खर्च झाले आहेत. प्रत्यक्षात खड्डे आणि रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. त्यामुळे झालेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी. निकृष्ट काम करणारे आणि काम न करताच पैसे घेणाऱ्या कंत्राटदाऱ्यांना तातडीने काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाशिक महापालिकेच्या कामकाजाबाबत विधिमंडळातही मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या आहेत. शहरातील नागरिक या कारभाऱ्याला कंटाळले असून प्रशासन संशयास्पद काम करीत आहे. शहरातील रस्ते तातडीने न बुजविल्यास शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महापालिका मुख्यालयावर मोठे आंदोलन करील असा इशारा यावेळी देण्यात आला.

अतिरिक्त आयुक्त यांनी महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने विविध सूचना केल्या आहेत. येथे चार दिवसात प्राधान्याचा विषय म्हणून महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये विभागनिहाय खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येईल. हे प्राधान्याचे काम म्हणून अधिकाऱ्यांनी तातडीने पूर्ण करून अहवाल सादर करावा अशा सूचनाही श्रीमती नायर यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

Shivsena UBT Politics on Potholes in Nashik Rode
Shivsena UBT vs BJP : "गांडूंचे राज्य गांडू लोकांसाठी"; निशिकांत दुबेंवर टीका करताना राऊतांनी PM मोदींपासून शिंदेपर्यंत सर्वांना फटकारलं...

यावेळी शिवसेना उपनेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, महिला आघाडीच्या स्वाती पाटील, कीर्ती जवखेडकर, केशव पोरजे, बाळासाहेब कोकणे, मसुद जिलानी, उत्तम कोठुळे, सचिन बांडे, देवा जाधव, राहुल दराडे, श्रद्धा दुसाने, राजू मोरे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त श्रीमती नायर यांच्या कार्यालयात शहरातील खड्ड्यांची दुरावस्था आणि नागरिकांच्या समस्या मांडल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com