Shivsena UBT-MNS : ठाकरे बंधुंच्या युतीच्या आधीच शिवसेनेसह महायुतीला धक्का देण्याची तयारी? तळकोकणात मनसे-शिवसेनेत गुप्त बैठका

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर एकाच मंचावर आले. या दोघांचा एकत्र आणणारा दूवा मराठीचा धरला. त्यानंतर आता युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Uddhav and Raj Thackeray at the Marathi Vijay Melava in Worli.
Uddhav and Raj Thackeray at the Marathi Vijay Melava in Worli.
Published on
Updated on

Ratnagiri news : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे नुकतेच एका व्यासपीठावर आले होते. राज्य सरकारने लादलेल्या हिंदी सक्ती आणि त्रिभाष्या धोरणाविरोधात दोन्ही बंधुंनी आवाज उठवला होता. तर भव्य मोर्चा काढण्याचा सरकारला इशारा दिला होता. ज्यामुळे धास्तावलेल्या महायुतीने दोन्ही निर्णय मागे घेतले. यानंतर शनिवारी (ता.5) विजयी मेळावा पार पडला. ज्यात राज आणि उद्धव यांनी आम्ही एकत्र येण्यासाठी एकत्र आल्याचे सांगितले. यामुळे आता मनसे- शिवसेनेत युती होण्याची शक्यात वर्तवली जातेय. अशातच आता कोकणातील दोन मतदारसंघात ठाकरे बंधुंच्या मनोमिलनानंतर मनसे- शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत गुप्त बैठकांचं सत्र सुरू झाले आहे. जी महायुतीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

कधीकाळी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आता येथे नेते नाहीत पण हाडकोर शिवसैनिक अद्याप ठाकरेंच्या बाजूने उभा आहे. तसाच तो राज ठाकरे याच्या मनसेच्या बाजूने देखील आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात माजी खासदार विनायक राऊत, विद्यमान खासदार भास्कर जाधव शिवसेनेची मदार सांभाळून आहेत. तर खेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे मनसेला ताकद देताना दिसत आहेत. यामुळे मनसे-शिवसेना युती झाल्यास महायुतीला प्रामुख्याने दापोली आणि गुहागर मतदारसंघात आव्हान निर्माण होऊ शकते.

रत्नागिरी मधील दापोली मतदारसंघ हा उत्तर रत्नागिरीत येणार असून खेड नगर परिषद, दापोली व मंडणगड नगर पंचायत आणि साडेतीन जिल्हा परिषद गट यात येतो. तर उर्वरीत साडेतीन जिल्हा परिषद गट गुहागर विधानसभा मतदारसंघात जातो.

Uddhav and Raj Thackeray at the Marathi Vijay Melava in Worli.
Kokan Politics : रामदास भाई, आरोप करून शांत झालात, पण तटकरे अजूनही पत्राची वाट पाहातायत...

गुहागर विधानसभा मतदारसंघात सध्या विद्यामान आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा असून भास्कर जाधव यांचा येथे वरचष्मा आहे. पण दापोली मतदार संघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वर्चस्व निर्माण केलं आहे. तसेच खेड नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी देखील खेड शहरी भागासह ग्रामीण भागात मनसेची ताकद वाढवली आहे.

Uddhav and Raj Thackeray at the Marathi Vijay Melava in Worli.
Kokan Politics : गोगावलेंची कट्टर विरोधक अन् ठाकरेंची वाघीण भाजपच्या वाटेवर; एका दगडात दोन पक्षी मारणार...

त्यामुळे ठाकरे शिवसेना व मनसे यांच्यात यूती झाल्यास येथे मोठा धक्का महायुतीला बसू शकतो. हीच शक्यता लक्षात घेऊन तसेच आगामी स्थानिकच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये गुप्त बैठकांना जोर वाढला आहे. या बैठकांमधून आगामी निवडणुकांची व्यूहरचा बनवली जातेय. दरम्यान राज आणि उद्धव एकत्र येण्याचा दिवस ठरल्यानंतर तसेच सरकारने त्रिभाषेचा निर्णय रद्द केल्यानंतर खेडमध्ये मनसे व शिवसेना (उबाठा) कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com