
थोडक्यात बातमी :
उद्धव ठाकरेंची फटकेबाजी: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेतील निरोप समारंभाच्या कार्यक्रमात जोरदार भाषण केले.
शिंदे गट आणि पक्षबदलूंना टोला: त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव घेत, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आणि त्यांना सोडून गेलेल्यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले.
निष्ठा आणि बाळासाहेबांचे स्मरण: दानवेंच्या निष्ठेचे कौतुक करताना, त्यांनी 'भरलेल्या ताटाशी प्रतारणा न केल्याबद्दल' त्यांचे कौतुक केले आणि हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवणही सांगितली.
Mumbai News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज विधानपरिषदेत जोरदार फटकेबाजी पहायला मिळाली. त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव घेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह त्यांना सोडून गेलेल्यांना टोले लगावले. यावेळी त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगितली. तर अंबादास दानवे तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत. पण भरलेल्या ताटाशी प्रतारणा ही केली नाही. ज्या पक्षात आहात त्या पक्षाचीही प्रतारणा केली नाही. ताटात जे आहे ते माझंच आहे, आणखीन मिळावं म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं अपराधही केला नाहीत, असे म्हणत नाव न घेता जोरदार टीका केलीय. ते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.
“अंबादास दानवे हे या सभागृहातील पहिला कार्यकाळ पूर्ण करत आहेत. ते निवृत्त होत नाहीत. त्यामुळे त्यांनी आत्ता सभागृहात ‘मी पुन्हा येईन’ असं जोरात बोललं पाहिजे. कारण हे महत्त्वाचं असून याच पक्षातून येणार असंही म्हणायला हवं असे म्हणत दानवे यांचं कौतुक केलं आहे. तर त्यांना उमेदवारी देताना काही लोकांचे चेहरे वेगळे होते असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी, सभागृहात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत असून त्यांनी आपल्याला भारतीय जनतापार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेला चांगला कार्यकर्ता दिला. पण आज ते माझे आभार मानतील की नाही हे माहित नाही. कारण त्यांनी माझ्याकडून त्यांनी काही लोक घेतले असल्याचा टोला लगावला.
अंबादास मला तुमचा खरंच अभिमान असून तुमचे काम बघून शिवसेनाप्रमुखांनी सुद्धा अभिमान वाटत असेल. तुमची पहिली टर्म पूर्ण होते. तुम्ही किती शिकलो त्यापेक्षा काय शिकलात आणि त्याचा उपयोग हा जनमानसासाठी काय करता हे दाखवून दिलं आहे. पण काही लोक सतत पद आपल्याकडेच रहावे म्हणून तडफडत असतात, पण तुम्ही तसं कधीच केलं नाही, असेही ठाकरेंनी म्हटलं आहे.
यावेळी ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह त्यांना सोडून गेलेल्यांना टोला लगावताना, अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत. पण भरलेल्या ताटाशी कधीच प्रतारणा केली नाही किंवा पक्षाशीही. तर अधिकचे मिळावे म्हणून दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जायचा अपराध तुम्ही केला नाही त्याच्याबद्दल सगळी जनता ही तुम्हाला धन्यवाद देत असेल असे म्हणात एकनाथ शिंदेंसह शिवसेनेला डिवचलं आहे.
अंबादास सारखे निस्वार्थी कार्यकर्ते हे जिथे असतील तिथे त्यांना कुठल्याही सत्तेची किंवा पदाची आवश्यकता नाही. त्यांच्यात असलेली जनतेसाठीचे प्रेम आणि त्यांची निष्ठाच त्यांना वेगळी उंची प्राप्त करून देते. तुम्ही तुमच्या स्वभावानुसार निष्ठेने अशीच आणखीन वाढवाल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
प्र. उद्धव ठाकरे कोणत्या कार्यक्रमात बोलत होते?
उ: विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात.
प्र. त्यांनी कोणावर टीका केली?
उ: उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदे गटावर आणि पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली.
प्र. काय विशेष विधान त्यांनी केलं?
उ: “ताटात जे आहे ते माझंच आहे... दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा गुन्हा केला नाही,” असं म्हणत त्यांनी राजकीय निष्ठेचं महत्त्व अधोरेखित केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.