Dhirendra Shastri : केंद्रीय मंत्र्यांचा धीरेंद्र शास्त्रींना कडक शब्दांत इशारा: 'महाराष्ट्राच्या नादी..'

Dhirendra shastri maharashtra controversy : धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून केंद्रीय मंत्र्यांनी कडक इशारा दिला. महाराष्ट्रात यावरून राजकीय वातावरण तापले असून प्रतिक्रिया उमटत आहेत.
Dhirendra Shastri
Dhirendra Shastrisarkarnama
Published on
Updated on

नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या विधानामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून अनेक ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात येत आहेत.

सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि शिवप्रेमी नागरिकांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.

Dhirendra Shastri
Rajya Sabha news : मोठी बातमी : राघव चड्ढांना ‘आप’ धक्का देण्याच्या तयारीत, दुसरीकडे 7 खासदारांबाबत सभापतींनी घेतला सर्वात मोठा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणही तापले असून विविध नेत्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही या प्रकरणावर स्पष्ट आणि ठाम भूमिका घेत धीरेंद्र शास्त्री यांना इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, आपल्या मर्यादा ओळखून आपल्या कुवतीप्रमाणे राहिले पाहिजे!.छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राचा देदीप्यमान इतिहास समजून घेणं, हा काही तुमच्या हातसफाईचा आणि थोतांडाचा खेळ नाही. हा विषय कोणत्याही प्रकारच्या दिखाव्याचा किंवा लोकप्रियतेसाठी केलेल्या विधानांचा भाग बनवणे योग्य नाही.

Dhirendra Shastri
Chhatrapati Shivaji Maharaj insult issue : शिवद्रोहावर दुहेरी मापदंड? छिंदमला धाक, गायकवाडांना मोकळं मैदान!

रामदास आठवले यांनी पुढे असेही सांगितले की, "महाराष्ट्र हा फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवरायांच्या या पुरोगामी महाराष्ट्राच्या नादी लागू नका!" दरम्यान, महाराष्ट्रातील इतिहासाबाबत बोलताना जबाबदारीने आणि आदराने बोलणे अपेक्षित आहे. चुकीची विधाने करून समाजात संभ्रम निर्माण करणे किंवा भावना दुखावणे हे कुणालाही मान्य होणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com