

Jeffrey Epstein files : अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीनच्या चौकशीचा भाग म्हणून 3 लाख कागदपत्रे रिलीज केली आहेत. या कागदपत्रांचा आधारे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी, भारतीय राजकारणात खळबळ उडवून देणारं कनेक्शन समोर आल्याचा दावा केला आहे.
जेफ्र एपस्टीन याच्या मेलमध्ये पीएम नरेंद्र मोदी आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्या नावाचा उल्लेख असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी करत खळबळ उडवून दिली आहे.
काँग्रेस (Congress) नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, "जेफ्री एपस्टीनच्या मेलमध्ये भारतातील आजी-माजी खासदार आहेत, त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ई-मेलमध्ये आहे." आणखी एका मेलमध्ये, अमेरिकेतली एक मोठा अधिकारी जो, ट्रप यांचा सल्लागार होता, स्टीम व्हॅनन नावाचा, तो एपस्टीनला विनंती करतो की, मला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं आहे. एपस्टीनकडून उत्तर येतं की, मी प्रयत्न करतो की, तुमची गाठ होईल का? नंतर काही दिवसांनी अशी ई-मेल येते की, मोदी आॅन बोर्ड. म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत. मग मोदी अन् एपस्टीनचं काय नातं आहे, एपस्टीन मोदींशी कुणाशीही भेट घडवू शकतो. याच उत्तर सरकारकडून मिळावं लागेल, असेही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
'अमेरिकेच्या जेफ्री एपस्टीनमध्ये अनेक प्रकरण समोर येणार आहेत. अमेरिका आणि भारतीय माध्यम त्याचा शोध घ्यावा लागेल. अमेरिका सरकारने खुल्या फाईल्समध्ये जेफ्री एपस्टीन आत्महत्या झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील आहे. दोन खटले सुरू असून, त्या खटल्यामध्ये काय काय पुरावे दिले गेले आहेत, विशेष म्हणजे महिलांची साक्ष देखील आहे. यात डिजिटल सामग्री देखील आहे. याचे विश्लेषण करायला वेळ लागणार आहे. परंतु जगातील सर्व पत्रकार यावर काम करत आहेत,' असे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यंनी म्हटले.
'अमेरिकेमध्ये हे प्रकरण गाजत होते .परंतु त्याचे भारतावर राजकारणामध्ये परिणाम होतील का? असा मी प्रश्न केला होता. परंतु मला शंका आहे, त्याचे परिणाम होतील. त्यावेळी कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे मी कोणाचाही नाव घेतलं नव्हतं. परंतु आता काही नाव समोर येऊ लागले आहेत. त्यात बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे आणि त्याचा भारतावर परिणाम होणार आहे. अशी मला शंका होती आणि ती शंका मी आपल्यासमोर व्यक्त केली. त्यातून खूप मोठी चर्चाही झाली होती. त्यावेळी मी सुचित देखील केलं होतं की सरकारमध्ये मोठ्या पदावर बदल देखील होतील,' असा पृथ्वीराज चव्हाण यांनी पुनरूच्चार केला.
'जेफ्री एपस्टीन फाईल्स ट्रान्सफरनुसार भारतातील काहींची नावं समोर येऊ लागली आहेत, त्यात उच्च भारतीय देखील असल्याचं समोर येतं. यात बाल लैंगिक शोषण झालेला आहे अमेरिकन नागरिकांचं, असं जर सिद्ध झालं आणि तसा पुरावा जर समोर आला, तो अमेरिकेत गुन्हा घडतो आणि त्यात कडक अशी शिक्षा आहे. भारतीय कायद्यानुसार एखाद्या भारतीय नागरिकांनी कुठेही गुन्हा केला, तरी त्याला भारतात देखील शिक्षा होऊ शकते. आता पुरावे समोर आल्यानंतर यातून पळवाटा देखील काढल्या जातील. माझा काही संबंध नाही, हे माॅर्फ केलेले फोटो आहेत. व्हिडिओ चित्रण एकत्र करून दाखवलं आहे, अशा अनेक काही गोष्टी होतील. परंतु जनतेच्या न्यायालयात, ते सर्व खुलं होईल. मग अशा लोकांच्या माध्यमातून सरकार चालवायचं का नाही, हे ज्यांनी नेमलं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे,' असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
'जेफ्री एपस्टीन फाईल आता खुल्या केल्या गेल्या आहेत. अजून काही फायली खुल्या व्हायच्या आहेत, त्याला आठवडा जाईल, असं अमेरिका सरकारचं म्हणणं आहे. सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरवात झाली आहे. यात सरकारमधील खासदारांचे म्हणणं आहे की, अमेरिकेच्या राष्ट्रपतीचा यात संबंध आहे, माहिती लपवण्याचा प्रयत्न करतील. परंतु ते अमेरिकेच्या कायद्याचे उल्लंघन आहे, यात मोठा संघर्ष होईल,' असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
यात काही नाव भारतातील असल्याचे कुठेतरी पुढे आलं आहे. काही मेल पुढे आलेले आहेत. माध्यमांमध्ये याची खूप काही चर्चा होईल. 300 जीबी डेटा आहे. लक्षावधी मेल्स आणि फोटोग्राफ असतील. 95 हजार फोटोग्राफ्स गेल्या आठवड्यात रिलिज झाली आहेत. त्यात शोध पत्रकारितेचा खूप महत्त्वाचा वाटा ठरणार आहे.
जेफ्री एपस्टीन हा गुन्हेगार आहे, त्याला शिक्षा झालेली आहे, हे सर्व समोर आलेलं आहे आणि मोदींचा संदर्भ जो आहे तो 2014 देखील मिळतो आहे. विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे, देह व्यापार करतो. मग मोदींची त्यांची गाठ कोणी घालून दिली, अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते, त्यांचेही नाव आलेलं आहे, त्यांची यात काय भूमिका आहे, हे सर्व शोधावं लागेल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
जेफ्री एपस्टीन एका मेलमध्ये, असा उल्लेख आहे की मला बऱ्याचशा मुली मिळाल्या आहेत, त्या ईस्ट युरोप मधल्या आहेत, प्रत्येक मुलीला हजार हजार डॉलर ती बाई मागत आहे, असा उल्लेख आढळला आहे. हा विकृत धंदा चालला होता. यामागे ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता.जेफ्री एपस्टीन हा माणूस इस्त्राईलचा हेर होता आणि त्याचं काम होतं की बड्या लोकांना ब्लॅकमेल करायचं. आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं का शोधावं लागेल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणत खळबळ उडवून दिली.
पंतप्रधान मोदींनी त्याची भेट घेतली आहे का? यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, शक्यता असेल. कारण की तिथल्या राजदूताने सांगितलं असेल, हा इकडचा मोठा माणूस आहे. आपण भेट घ्या, असं काही सांगितले असले तरी, दोष आहे असं सांगता येणार नाही. याच्यामध्ये खूप विश्लेषण करावं लागेल. पण एक आहे की, या व्यक्तीशी तुमचा (मोदी यांचा) संबंध कसा आला, हा प्रश्न उपस्थित होतो, याकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.