नाशिक भाजपसाठी गिरीश महाजन संकटमोचक ठरतील काय?

महापालिका निवडणुकीसाठी गिरीश महाजन पुन्हा भाजपाचे प्रभारी झाले.
BJP leader Girish Mahajan
BJP leader Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : चार नगरसेवकांच्या हाती शिवबंधन बांधून भारतीय जनता पक्षाला (BJP) शिवसेनेने (Shivsena) धक्का दिल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पक्षश्रेष्ठींनी तातडीने नाशिकच्या (NMC) प्रभारी भाजपचे संकटमोचन म्हणून संबोधले जाणारे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती केली, तर विद्यमान प्रभारी आमदार जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्याकडे सहप्रभारी पदाची जबाबदारी दिली. मात्र पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेल्याने संकटमोचन महाजन डॅमेज कंट्रोल करण्यात कितपत यशस्वी होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

BJP leader Girish Mahajan
दर आठवड्याला भाजपचे ५ नगरसेवक शिवसेनेत येतील?

राज्यात भाजपची सत्ता असताना नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे होते. महाजन यांच्या कार्यशैलीमुळे तळागाळापर्यंत भाजपचे कार्य पोचण्यास मदत झाली. महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता तर मिळालेच त्याशिवाय जिल्ह्यातील पालिका, नगर परिषदा व जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात सदस्य निवडून आले. भाजपला एकापाठोपाठ यश मिळण्यात महाजन यांचा मोठा वाटा राहिला. राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने सत्तांतर झाल्यानंतर महाजन यांचे नाशिककडे दुर्लक्ष झाले.

BJP leader Girish Mahajan
शहराध्यक्षांच्या नाकर्तेपणामुळे मी भाजप सोडला!

नाशिक महापालिकेत बहुमत असूनही सत्ता जाण्याची वेळ आली. आमदार बाळासाहेब सानप समर्थक नगरसेवकांनी स्वतंत्र गट तयार करत भाजप विरोधातच बंडाचा झेंडा उभारला. या परिस्थितीतही महाजन यांनी फुटलेल्या नगरसेवकांना परत आणून भाजपचे डॅमेज कंट्रोल केले. अशीच परिस्थिती जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये पाहायला मिळाली. मात्र राज्यात महाविकास आघाडी भक्कम होत असताना महाजन यांच्यावरच संकट ओढवले. जळगाव येथील बी. एच. आर. पतसंस्थेतील घोटाळा, तसेच काही अन्य कारणांमुळे महाजन त्यात गुंतत गेले.

त्यापूर्वी भारतीय जनता पक्षाने नाशिकच्या प्रभारीपदाचा कार्यभार आमदार जयकुमार रावल यांच्याकडे सोपवला. भाजपच्या काही नगरसेवकांना शिवसेनेकडून आव्हान मिळत असताना पक्षाकडून नैतिक पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे नाराजी वाढून विसंवाद वाढला. त्यात आज चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी संकटमोचन म्हणून प्रसिद्ध असणारे महाजन यांना पुन्हा नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यांच्याकडे पक्षाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला असून, रावल हे सर्व प्रभारी राहणार आहे.

महाजन गळती रोखतील काय?

दर आठवड्याला चार ते पाच नगरसेवक सेनेत दाखल करण्याची घोषणा झाल्या. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश निवडणुकीत व्यस्त असलेल्या गिरीश महाजन ३ मार्चला नाशिक शहरामध्ये दाखल होणार आहे. पक्ष कार्यालयात पदभार स्वीकारल्यानंतर तातडीने बैठक घेऊन डॅमेज कंट्रोल रणनीती आखणार आहे. मात्र निवडणुकीला अगदी कमी कालावधी शिल्लक राहिला असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणी पूर्ण होऊन फक्त भविष्याचा मुहूर्ताची वाट पाहणाऱ्या नगरसेवकांना महाजन कसे रोखणार, याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com