दर आठवड्याला भाजपचे ५ नगरसेवक शिवसेनेत येतील?

मुंबई येथे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत चार नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
BJP Corporators join Shivsena in presence of Aditya Thakre & Sanjay Raut.
BJP Corporators join Shivsena in presence of Aditya Thakre & Sanjay Raut.Sarkarnama

नाशिक : मराठी माणुस, महाराष्ट्राविरूद्ध काम करणारा भारतीय जनता पक्ष (BJP) आता लोकांना कळला आहे. त्यांच्या पक्षातील प्रामाणिक लोक देखील त्याबाबत अस्वस्थ आहेत. त्याची झळ भाजपला सोसावी लागेल. या पक्षाचे नाशिकचे (NMC) वीस नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

BJP Corporators join Shivsena in presence of Aditya Thakre & Sanjay Raut.
जयकुमार रावल यांच्या नाशिकच्या दरबारी राजकारणाला भाजपची वेसन!

महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का देण्याची घोषणा करणाऱ्या शिवसेनेकडून धक्कातंत्राला सुरवात झाली आहे. भाजपचे प्रथमेश गिते, हेमलता कांडेकर, डॉ. सीमा ताजणे व अपक्ष मुशीर सय्यद यांनी मातोश्री निवासस्थानी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधल्याने नाशिक शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

BJP Corporators join Shivsena in presence of Aditya Thakre & Sanjay Raut.
शहराध्यक्षांच्या नाकर्तेपणामुळे मी भाजप सोडला!

या नगरसेवक व भाजप पदाधिकाऱ्यांचा मुंबईत सह्याद्री विश्रामगृहावर पक्षप्रवेश झाला. महापालिका निवडणुकीची घोषणा होईपर्यंत शिवसेनेत टप्प्याटप्प्याने भाजपचे वीस नगरसेवक अजून प्रवेश करणार आहे. त्यासाठी दर एक ते दीड आठवड्यात पाच नगरसेवकांच्या हाती शिवबंधन बांधले जाणार आहे. पंचवटी, सातपूर व मध्य नाशिकमध्ये भाजप संघटना खिळखिळी करण्याबरोबरच नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला जाईल, असा दावा करण्यात आला.

शहरात प्रारंभी माजी आमदार वसंत गिते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्याने सात ते आठ हजार मुस्लिम मतदार प्रभाग सतरामध्ये समाविष्ट झाल्याने गिते यांनी सेना प्रवेशाचा मुहूर्त निश्‍चित केला. मात्र प्रवेश करताना अपक्ष मुशीर सय्यद यांना बरोबर घेतल्याने तिघांच्या पॅनलमध्ये दोघांची निश्‍चिती झाली आहे. आता एक मराठा उमेदवार म्हणून होळकर नामक व्यक्तीचा शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्‍चित आहे.

नगरसेविका हेमलता कांडेकर यांनी भाजपचे दिनकर पाटील यांच्या कार्यपद्धतीला वैतागून शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर केले. डॉ. सीमा ताजणे यांची घरवापसी झाली असून, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असा प्रवास करत त्या पुन्हा पती राजेंद्र ताजणे यांच्यासह सेनेत दाखल झाल्या.

आजच्या प्रवेश सोहळ्याप्रसंगी संपर्क नेते संजय राऊत, उपनेते सुनील बागूल, जिल्हा संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, वसंत गिते, विनायक पांडे आदी उपस्थित होते.

संघटनेलाही भगदाड

शिवसेनेने भाजपच्या सत्तेला धक्का देताना संघटनेलाही भगदाड पाडण्यास सुरवात केली आहे. भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शंभू सुनील बागूल यांच्या हाती सह्याद्री अतिथिगृहात शिवबंधन बांधण्यात आले.

---

भाजप नगरसेवकांच्या सेना प्रवेशाचा प्रारंभ झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास असल्याने अनेक जण शिवसेनेत येण्यास इच्छुक आहे. आता चार नगरसेवकांचा प्रवेश झाला. टप्प्याटप्याने अजून वीस नगरसेवक शिवसेनेत येतील.

-भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com