शहराध्यक्षांच्या नाकर्तेपणामुळे मी भाजप सोडला!

भाजपमध्ये यापुढे तरी महिला व सामान्यांच्या तक्रारीची दखल घ्यावी.
BJP Corporator Hemlata Kandekar.
BJP Corporator Hemlata Kandekar.Sarkarnama

नाशिक : मी भाजपची (BJP) एकनिष्ठ नगरसेविका आहे. पक्षाचे नगरसेवक दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी महापालिकेच्या अधिकारी, कार्यकर्त्यांसमोर आम्हाला शिविगाळ करीत होते. अपशब्द वापरून अपमान करीत होते. त्याबाबत वेळोवेळी महापालिका (NMC) पदाधिकारी व शहराध्यक्षांकडे माहिती देऊन न्याय मागितला. मात्र शहराध्यक्षांनी काहीच केले नाही. त्यांच्या निष्क्रीयतेमुळेच मी पक्ष सोडत आहे, असे पत्र नगरसेविका हेमलता कांडेकर (Hemlata Kandekar) यांनी म्हटले आहे.

BJP Corporator Hemlata Kandekar.
देवेंद्र फडणवीसांची पाठ फिरताच भाजप ४ नगरसेवक शिवसेनेत!

भाजप नगरसेविका हेमलता कांडेकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा महापालिका आयुक्तांकडे दिला. त्यानंतर त्यांनी पक्षाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी पत्र दिले आहे. या पत्राच्या प्रती त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संपर्क मंत्री जयकुमार रावल, माजी मंत्री गिरीश महाजन यांसह विविध नेत्यांना पाठविल्या आहे. आपला राजीनामा देताना त्यांनी `किमान यापुढे तरी पक्षात महिला व सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. त्यांच्या तक्रारींकडे लक्ष दिले जावे` अशी अपेक्षा कळकळीची विनंती केली आहे.र

BJP Corporator Hemlata Kandekar.
`राष्ट्रवादी`ची मागणी कृषीमंत्री दादा भुसे मान्य करतील का?

या पत्राचा आशय असा, आम्ही चार नगरसेवक २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे चार नगरसेवक प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आलो होतो. मात्र या पॅनेलचे स्वयंघोषित नेतृत्व करणारे नगरसेवक दिनकर पाटील यांनी पहिल्यापासूनच आमच्यावर अंकुश ठेवला होता. अशा परिस्थितीत देखील त्यांनी पक्षाच्या ध्येय धोरणा विरोधात जाऊन व पक्ष शिस्त न पाळता महापालिका सभागृहामध्ये ठिय्या आंदोलन केले. त्यात सहभागी होण्यासाठी आमच्यावर दबाव आणला. आम्ही त्या आंदोलनात सहभागी होण्यास असमर्थता दाखविली.

त्यानंतर २०१९ मध्ये श्री पाटील यांनी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदारसंघातुन स्वयंघोषित उमेदवारी जाहीर केली. त्यातून त्यांनी पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी देखील मी माझे पती दादा संतु कांडेकर यांच्यांवर प्रचंड दबाव आणला. नगरसेवक पाटील व त्यांच्या भावाने आम्हास घरी बोलावून अपशब्द वापरले. धमकी दिली. तसेच विभागातील महापालिका अधिकाऱ्यांसमोर घरी बोलावून नगरसेविका कांडेकर यांनी सांगितलेले काम एैकायचे नाही, असे सांगून दबाव आणला.

त्याचा परिणाम असा झाला की महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे आम्ही नागरिकांच्या अडचणी, समस्या तसेच नागरि प्रश्न सांगितल्यावर त्याची दखल घेतली जात नव्हती. अधिकारी श्री. पाटील यांच्या सोबत प्रभागात दौरे करायचे. पाहणी करीत असत, मात्र माझे काहीच एैकत नव्हते. मी सत्ताधारी भाजपची नगरसेविका असुनही अन्याय होत होता. मला अधिकाऱ्यांसमोर शिविगाळ झाली. त्याबाबत मी पक्षाचे शहराध्यक्ष या नात्याने आपल्याकडे तक्रार केली. पत्र दिले. मात्र शहराध्यक्ष निष्क्रीय राहिले. त्यांनी हा अन्याय होऊ दिला. त्यामुळे भाजपने मला भरभरून दिले, तरीही शहराध्यक्षांमुळे पक्ष सोडावा लागत आहे.

हेमलता कांडेकर या निष्क्रीय होत्या. त्या फारशा संपर्कात नव्हत्या. यापूर्वीच त्या आमच्या विरोधकांसमवेत काम करीत होत्या. भाजप आपल्याला उमेदवारी देणार नाही, अशी भावना झाल्यानेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचे आरोप तत्थ्यहीन आहेत.

- गिरीश पालवे, शहराध्यक्ष, भाजप.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com