BJP leaders helpless in APMC : नाशिक बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या विरोधात पॅनेलची घोषणा भाजप नेत्यांनी केली. त्यात नगरसेवक दिनकर पाटील, शिवाजी चुंभळे आणि शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पॅनेल करणार होते. मात्र लोकसभा डोळ्यापुढे ठेऊन खासदार गोडसे यांनी दूर राहणेच पसंत केले. त्यामुळे भाजपचे दिनकर पाटील एकटे पडण्याची चिन्हे आहेत. (BJP leader Dinkar Patil couldn`t get help for panel)
नाशिक (Nashik) बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांनी शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गट, काँग्रेसला बरोबर घेत पॅनेल करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे विरोधक शिवाजी चुंभळे यांनी पॅनेलसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र सर्वाधिक उत्साहाने पुढे आलेले भाजपचे (BJP) दिनकर पाटील (Dinkar Patil) कोणाबरोबर जाणार हे मात्र अद्याप स्पष्ट होईना. त्यामुळे ते एकटे पडण्याची चिन्हे आहेत.
नाशिक बाजार समितीचे माजी चेअरमन पिंगळे यांच्या विरोधात गेली काही वर्षे भाजपच्या नेत्यांनी सातत्याने सत्तेच्या माध्यमातून अनेक विघ्न आणले होते. त्यात दिंडोरीचे सुनिल केदार आणि नगरसेवक दिनकर पाटील आघाडीवर होते. शिवाजी चुंभळे यांची साथ त्यांना मिळत होती. त्यामुळे सहकार विभागाकडे सातत्याने तक्रारींचा पाऊस पडत होता.
सध्या श्री. चुंभळे, दिनकर पाटील यांनी पॅनेलच्या हालचाली केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून शिंगवे (ता. निफाड) येथील गणेश गिते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे डावपेच असल्याचे बोलले जाते. मात्र दिनकर पाटील यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना बरोबर घेऊन पॅनेल निर्मिती करणार असल्याचे चित्र होते. ते आता धुसर होऊ लागले आहे. कारण शिंदे गटाने या निवडणुकीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. त्यात भाजपचे दिनकर पाटील एकटे पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत ते काय करतात हे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान श्री. पिंगळे यांनी माघारीच्या शेवटच्या दिवशी आपल्या पॅनेलचे उमेदवार घोषीत करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आज सकाळी आडगाव येथून प्रचार दौऱ्याला सुरवात देखील केली आहे. त्या तुलनेत विरोधकांमध्ये अद्याप ताळमेळ दिसत नाही. नेतेच ठरत नसल्याने उमेदवार केव्हा ठरणार असा गंभिर प्रश्न आहे.
ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार, असे चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि माजी सभापती देविदास पिंगळे यांच्यात मंगळवारी बैठक झाली. यात जागा वाटपाबाबत चर्चा झाली असून, काही जागांवर एकमत झाले आहे. पुढील बैठकीत ठोस निर्णय होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते सुनील बागूल यांनी दिली.
पॅनेल होणारच : दिनकर पाटील
दरम्यान याबाबत दिनकर पाटील म्हणाले, बाजार समितीत यंदा निश्चितच परिवर्तन होईल. मी आणि खासदार हेमंत गोडसे एकत्र येऊन पॅनेल करणार आहे. त्याबाबत चर्चा सुरु आहे, असे भाजप नेते, माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.