Gram Panchayat Corruption : 22 लाखांच्या निधीवर डल्ला ! महिला सरपंचाच्या प्रतापाने खळबळ

Bhavadi, Shrigonda : भावडी ग्रामपंचायतीच्या सरपंचास अटक, तर ग्रामसेवक निलंबित
Sarpanch
SarpanchSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : नगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील भावडी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच आणि ग्रामसेवकाने शासनाच्या 14 आणि 15 व्या वित्त अयोगाच्या निधीत मोठा गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यानुसार ग्रामसेवकाला निलंबित केले, तर सरपंचास अटक करण्यात आली आहे. या प्रकाराने श्रीगोंदा तालुक्यासह नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

भावडी (ता. श्रीगोंदा) गावच्या महिला सरपंच धनश्री करनोर यांनी आपल्या कार्यकाळात तब्बल 21 लाख 23 हजार 353 रुपयांच्या गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी विस्तार अधिकारी यांच्या तक्रारीनंतर कामकाजात अनियमितता केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सरपंच करनोर यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो फेटाळल्याचा आदेश प्राप्त होताच पोलिसांनी करनोर यांना अटक केली, तर ग्रामसेवक आतिष दादासाहेब आखाडे यांना जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशाने निलंबित केले आहे.

Sarpanch
Crop loan: धक्कादायक: किडनी, लिव्हर, डोळे विकत घ्या! दहा शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; कर्ज फेडण्यासाठी...

सरपंच करनोर आणि ग्राम सेवक आखाडे यांनी संगनमताने 14 आणि 15 व्या वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपुरवठा यासाठी असलेल्या निधीत गैरव्यवहार केला आहे. याबाबत आदेश देऊनही त्यांनी कोणतेही दस्तावेज गटविकास अधिकारी यांनी सादर केले नाहीत. त्यांनी स्वतः हजर न राहता आपले म्हणणे सादर केले असले तरी त्यासोबत कुठलेही रेकॉर्ड दिले नाही. यानंतर ग्रामपंचायतीचे 14, 15व्या वित्त आयोग, ग्रामनिधी, पाणीपुरवठा अशी राष्ट्रीयीकृत बँकेत असलेली चार खात्याचे स्टेटमेंट तपासली. त्यात सुमारे 68 व्यवहारांच्या नोंदी आढळून आल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सर्व कामांचा तपशील, प्रमाणके, कॅशबुक, टेंडर नोटिसा आदींची तपासणी केली. यातही मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सरपंच धनश्री करनोर आणि ग्रामसेवक आखाडे यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सरपंच करनोर या अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात गेल्या होत्या, तर ग्रामसेवक आखाडे याला अटक करण्यात आली होती. सध्या आखाडे याला कोर्टाकडून जामीन मंजूर केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sarpanch
BJP News : भाजपचा लोकसभा निवडणुकीचा अजेंडा जाहीर? सोशल मीडिया अकाउंटवरून दिला सूचक संदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com