Dhule APMC election News : निवडणुकीत काँग्रेस, भाजपची लोकसभेसाठी चाचपणी!

आमदार कुणाल पाटील यांच्या वर्चस्वाला खासदार डॉ. सुभाष भामरे देणार आव्हान
Kunal Patil & Subhash Bhamre
Kunal Patil & Subhash BhamreSarkarnama
Published on
Updated on

Congress-BJP politics of Dhule : धुळे बाजार समितीच्या निवडणुकीत काल शेवटच्या दिवसापर्यंत ३२० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या समितीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यंदा त्याविरोधात भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी त्यात पुढाकार घेतल्याने, ही लोकसभा निवडणुकीची चाचणी ठरण्याची शक्यता आहे. (Dr. Subhash Bhamre will form a BJP panel for Dhule APMC elestion)

धुळे (Dhule) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मुदतीत ३२० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्जांची ५ एप्रिलला छाननी होईल. नंतर २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असेल. बाजार समिती आजपर्यंत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नियंत्रणात राहिली आहे; परंतु यंदा केंद्र आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपने (BJP) ही निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Kunal Patil & Subhash Bhamre
Shinde Group's Working Committee: पदांचा पाऊस... तब्बल 200 जणांची कार्यकारीणी!

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. या मुदतीत अनेकांनी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरू होती. यात इच्छुक आणि समर्थकांची झुंबड उडाली होती. सेवा सहकारी संस्थेंतर्गत सर्वसाधारण संवर्गासाठी १२१, महिला राखीव २५, इतर मागासवर्ग ३०, विमुक्त जाती व भटक्या जमाती ३७, ग्रामपंचायतींतर्गत सर्वसाधारण संवर्गासाठी ६५, अनुसूचित जाती व जमाती १५, आर्थिक दुर्बल घटक ७, तसेच व्यापारी व अडते घटकातून १३ आणि हमाल व तोलारी घटकातून सात इच्छुकांनी अर्ज भरले.

निवडणूक अधिकारी म्हणून अशोक बागल, सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेंद्र विरकर, किरण पाटील, नागेश पुकळे, पंकज लोखंडे, श्री. गोसावी, सुनील मोगरे कामकाज पाहत आहेत. संचालक मंडळाच्या १८ जागांमध्ये सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, व्यापारी व अडते मतदारसंघातून दोन आणि हमाल व तोलारी मतदारसंघातून एक उमेदवार निवडून द्यायचा आहे. बाजार समितीचे एकूण चार हजार मतदार आहेत.

Kunal Patil & Subhash Bhamre
Chhagan Bhujbal News : जातनिहाय जनगणनेसाठी सर्वपक्षीय प्रयत्न गरजेचे

या बाजार समितीची सत्ता राखलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा भाजपचे कडवे आव्हान असेल. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी समितीवर सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. यात भाजपच्या स्थानिक नेत्यांचे कसब पणाला लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचे आव्हान कसे परतवले जाते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

मुदतीत माजी सभापती रितेश पाटील, गुलाब कोतेकर, बाजीराव पाटील, योगेश पाटील, बोरकुंडचे माजी सरपंच बाळासाहेब भदाणे, विजय गजानन पाटील, रावसाहेब गिरासे यांच्यासह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात बाळासाहेब भदाणे यांनी तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

Kunal Patil & Subhash Bhamre
Agitation Against Arvind Sawant: अरविंद सावंत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यंदा त्याला आव्हान देण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पुढाकार घेत भाजपच्या सर्व नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मेळाव्याला जवळ जवळ सर्वच भाजपचे नेते उपस्थित होते. त्यामुळे येत्या आठवडयाभरात पॅनेल निर्मितीसाठी महत्त्वाच्या घडामोडी होतील. त्यात लोकसभेचे पारंपारीक विरोधक आणदार कुणाल पाटील आणि खासदार भामरे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे ही लोकसभेची पुर्वचाचणी म्हणूनच त्याकडे पाहिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com