Agitation Against Arvind Sawant: अरविंद सावंत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

Shivsena agitaion at Nashik: शिवसेनेचा एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्त्यांकडून शहरात आंदोलन करण्यात आले.
Shivsena agitaion at Nashik
Shivsena agitaion at NashikSarkarnama
Published on
Updated on

Shivsena (Shinde) Nashik News: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या प्रतिमेला आज शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. स्तंभावर झालेल्या आंदोलनावेळी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार अरविंद सावंत यांनी केलेले विधान हे राजकीय नेत्यांवर चिकलफेक आहे. (CM Eknath Shinde supporters agitation in Nashik)

शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी आम्ही रिक्षावाल्यांचे नेतृत्व स्वीकारून त्यांच्या खाली काम नाही करणार असे सांगून सर्वसामान्य जनतेचा रिक्षा चालकांचा अपमान केला असा दावा करत नाशिक शहरात (Nashik) आंदोलन करण्यात आले.

Shivsena agitaion at Nashik
Sanjay Shirsat On Sushma Andhare : सुषमा अंधारे यांच्याबद्दल प्रश्न विचारू नका, माझ्यासासाठी तो विषय संपला..

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केलेल्या विधानावरून गेले काही दिवस चर्चा होत आहे. याबाबत एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. खासदार सावंत यांनी केलेले विधान हे शिवसेनेच्या मुळ स्वभावाच्या विरोधात आहे. शिवसेनेच्या विस्तारात रिक्षावाल्यांचा सहभाग राहिला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला अर्थात रिक्षा चालक एकनाथ शिंदे यांना नक्कीच मुख्यमंत्री केले असते. परंतु, ठाकरे गटाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. ठाकरे गटाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला नाही, त्यानंतर ही सर्वसामान्य शिवसैनिकांवर कार्यकर्त्यांवर अन्याय करत राहिले हे आज ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांच्या वक्तव्यातून जनतेसमोर आले आहे.

Shivsena agitaion at Nashik
Thackeray-Fadanvis News: संजय राऊतांनी भाजप -शिवसेनेच्या घोटाळेबहाद्दरांची यादीच फडणवीसांना पाठवली : पहा कोण आहेत ते नेते

सर्वसामान्य नागरिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री होऊ नये का असा सवाल यावेळी केला. यावेळी मध्य विधानसभा प्रमुख रोशन शिंदे, उपमहानगर प्रमुख आनंद फरताळे, युवा सेनेचे विस्तारक योगेश बेलदार, उपजिल्हाप्रमुख दिगंबर मोरे, उपजिल्हाप्रमुख शशिकांत कोठुळे, महेश जोशी, जिल्हा संघटक योगेश चव्हाणके, उपमहानगर प्रमुख उमेश चव्हाण, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रूपेश पालकर, जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते, सचिन भोसले, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख किरण पडवळ, भारतीय विद्यार्थी सेना महानगर प्रमुख शुभम पाटील आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com