Eknath Khadse; खडसेंच्या आरोपाने गुलाबराव गिरीष महाजनांच्या मदतीला धावले!

जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या औषध खरेदीत 45 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार?
Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil
Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao PatilSarkarnama

मुंबई : (Mumbai) जळगाव (Jalgaon) रुग्णालयाच्या औषध व साहित्य खरेदीत (Medicine) 45 कोटींचा गैरव्यावहार (Curroption) झाला आहे. मात्र त्याची चौकशीच होत नाही, अशी टिका एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आज विधानपरिषदेत केली. या आरोपानंतर गिरीष महाजन (Girish Mahajan) संतापले तर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) देखील महाजनांच्या मदतीला धाऊन आले. यावर सभापतींनी हस्तक्षेप करूनही बराच वेळ शाब्दीक बाण सुटत राहिले. (Two ministers came to gather in support of Girish Mahajan)

Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil
Dilip Bankar News: कांदा आंदोलन केल्यास निधी न देण्याची धमकी?

राज्य शासनाच्या वैद्यकीय विभागाच्या रुग्णालयांना लागणारी औषधे व सर्जीकल साहित्याच्या खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करण्याचे विधेयकावर आज विधान परिषदेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावच्या वैद्यकीय उपकरणे व औषध खरेदीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. त्यावरून जळगावच्या दोन्ही मंत्र्यांनी खडसेंवर प्रश्नांची सरबत्ती केली.

Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil
Nashik News: केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी देणे घेणे नाही!

यावेळी श्री. खडसे यांनी औषधे खरेदीच्या या प्रधिकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आहे. मुख्यमंत्र्यांना वेळ कसा मिळले. राज्यात महागाई आहे. पेट्रोल, अन्नधान्य तसेच विविध वस्तूंचे दर वाढत आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. त्या सगळ्यांकडे त्यांना लक्ष द्यावे लागते. त्यांना वेळ कुठे असेल. मुख्यमंत्र्यांना काही काम नाही, असे समजता काय?.

श्री. खडसे म्हणाले, या विधेयकाची गरजच नाही, कारण याने भ्रष्टाचार वाढीस लागेल. पारदर्शकता संपुष्टात येईल. आधीच जळगाव जिल्हा रुग्णालयासाठी औषधे व सर्जीकल साहित्याची खरेदी झाली, त्यात 45 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जाते. त्या सर्व वस्तू विनावापर पडून आहेत. त्याची चौकशीही होत नाही.

Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil
Jayant Patil; धक्कादायक, परिचारीकांकडून दोनशे कोटी गोळा केले?

या आरोपानंतर मंत्री गिरीष महाजन त्यांना अडवत खडसेंना उत्तर देऊ लागले. यामध्ये त्यांच्यात खडाजंगी झाली. सभापती त्यात हस्तक्षेप करून त्यांना शांत करीत असतानांच गुलाबराव पाटील देखील धावतच परिषदेत आले. त्यांनीही असा गौरव्यावहार झाला नाही. कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापन समिती होती. जिल्हाधिकारी निर्णय घेत होते. वरून आदेश यायचे. तुम्ही निराधार आरोप करू नका, असे म्हणाले.

त्यानंतर खडसे यांनी रेकॉर्ड तपासून पहा. मी कोणाचे नाव घेतलेले नाही. एकनाथ शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी त्याची तक्रार केली आहे. विविध यंत्रणांना भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्या. त्याची एक प्रत मला देखील दिली आहे, असे सांगत 45 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आहे, याचा पुनरूच्चार केला. त्यानंतर वरीष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांना थांबवत आपण विधेयकाच्या गुणवत्तेवर बोलावे. विरोध करावा किंवा समर्थन करावे. विषयाला फाटे फोडू नये, असे सांगितले. त्यावर खडसे यांनी ठामपणे मी त्यावरच बोलत आहे. विधेयकाचा विषय देखील तोच आहे. त्यात भ्रष्टाचाराच संबंध येतो, असे सांगितले.

Girish Mahajan, Eknath Khadse & Gulabrao Patil
Womens day News; `ट्रीलीयन डॉलर`चे लक्ष्य महिलाच पूर्ण करतील

त्यानंतरही वाद-विवाद सुरुच होता. श्री. पाटील यांनी उपरोधीकपणे जळगावच्या विषयावर विशेष अधिवेशन बोलवावे लागेल. त्यात जळगावचेच सदस्य बोलतील, असे सांगितले. सभापती तसेच अन्य सदस्यांनी देखील त्यात हस्तक्षेप करीत वाद शांत केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com