Anti Corruption Bureau : नगरचे आयुक्त जावळे लाचेच्या जाळ्यात; भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडले

Bribery case against Ahmednagar Municipal Commissioner Pankaj Jawale : नगर शहरातील बांधकाम व्यावसायिक त्यांच्या भागीदाराला बांधकाम परवानगी मिळण्यासाठी आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांनी स्वीय सहायक श्रीधर देशपांडे याच्यामार्फत नऊ लाख 30 हजार रूपये लाचेची मागणी केली. व्यावसायिकाने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना पथकाकडे तक्रार केली होती.
Commissioner Pankaj Jawale
Commissioner Pankaj Jawale Sarkarnama

Ahmednagar ACB News : अहमदनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे आणि त्यांचे स्वीय सहायक श्रीधर देशपांडे या दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. नऊ लाख रुपयांच्या लाचेच्या मागणीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जालनामधील पथकाने ही कारवाई केली.

आयुक्त जावळे आणि स्वीय सहायक देशपांडेविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच नगर शहरामधील भाजपच्या काही पदाधिकार्‍याने महापालिकेसमोर फटाके फोडून या कारवाईचे स्वागत केले.

लाचलुचपत (ACB) प्रतिबंधक विभागाच्या जालनामधील पथकाने अहमदनगर महापालिकेत केलेल्या या कारवाईची राज्यात चर्चा आहे. नगर शहरातील बांधकाम व्यावसायिक त्यांच्या भागीदाराने नगर महापालिका हद्दीतील नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केला आहे. या प्लॉटवर त्यांना बांधकाम करायचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी परवानगी मिळण्यासाठी महापालिका कार्यालयाकडे 18 मार्चला ऑनलाईन अर्ज केला होता. ही परवानगीसाठी आयुक्त जावळे यांनी स्वीय सहायक देशपांडे याच्यामार्फत नऊ लाख 30 हजार रूपये लाचेची मागणी केली. व्यावसायिकाने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना पथकाकडे तक्रार केली होती.

Commissioner Pankaj Jawale
Police Action Bank Officer: बँकेच्या कर्जप्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी मागितली लाच; वसुली अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

लाचलुचपत विभागाच्या 19 व 20 जून 2024 या तक्रारीची पडताळणी केली. देशपांडे याने तक्रारदाराकडे आयुक्त जावळे यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी आठ लाख रूपये लाचेची मागणी केली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आयुक्त जावळे हे देशपांडे यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या दोघांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर पथकाचे पोलिस (Police) उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्याकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.

Commissioner Pankaj Jawale
Farmers Suicide : सरकारची चिंता वाढवणारी बातमी! 4 महिन्यांत राज्यात तब्बल 800 हून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

आयुक्त, स्वीय सहायकाच्या शोधासाठी पथके रवाना

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना पथकाने सापळा यशस्वी केला. गुन्हा दाखलची प्रक्रिया केली. यानंतर आयुक्त जावळे आणि त्यांचा स्वीय सहायकाला ताब्यात घेण्यात आले नव्हते. त्यांच्या शोधासाठी नगरसह जालना लाचलुचपतची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. जावळे यांचे दालन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केले. तसेच त्यांचे सरकारी निवासस्थानाला देखील टाळे ठोकले होते.

देशपांडेंची उच्चभ्रू वस्तीत मालमत्ता

स्वीय सहायक श्रीधर देशपांडे याच्या घराची झडती पथकातील पोलिस निरीक्षक छाया देवरे यांनी घेतली. घर झडतीत 93 हजाराची रोख रक्कम, सुमारे साडेआठ तोळ्याचे सोन्याचे दागिने, एकुण नऊ मालमत्ता संदर्भात कागदपत्रे मिळाली. सदर मालमत्ता नगर शहरातील उच्चभ्रू वस्तींमध्ये खरेदी केलेली आहे. तसेच बीड जिल्ह्यात देखील शेत जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे.

आयुक्तांच्या घरी छापा

लाचेच्या गुन्ह्यात पसार असलेले आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांच्या सोलापुरातील घरी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पथकाने छापा घेतला. सोलापुरातील विद्या नगर परिसरात पंकज जावळे यांचे घर असून मागील चार वर्षांपासून इथे कोणीही राहयाला नसल्याची प्राथमिक माहिती आहे. पंकज जावळे अहमदनगरमध्ये आयुक्त होण्यापूर्वी सोलापुरात उपायुक्त, जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून होते. त्यावेळी विज्ञानगर येथे पंकज जावळे यांचे घर होते. याच घरात पथकाने तपासणी केली. पथकातील अधिकारी आणि सोलापूर पोलिसांचा बंदोबस्त यावेळी होता.

आयुक्तांचा कारभार जिल्हाधिकाऱ्यांकडे द्यावा

नगर शहराच्या इतिहासात काळिमा फासणारी घटना घडली आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि त्यांचा स्वीय सहायक श्रीधर देशपांडे याच्यामार्फत नऊ लाख 30 हजार रुपयांची लाचेच्या मागणीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. तसेच या लाचप्रकरणात आणखी कोण-कोण सहभागी आहेत, त्याच्या तळाशी जाऊन त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. कारवाई दरम्यान आयुक्त डाॅ. जावळे पसार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार जिल्हाधिकारी यांच्याकडे द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांनी नगरविकास मंत्री यांच्याकडे केली आहे. पंकज जावळे यापूर्वी नगरमध्ये उपायुक्त होते. त्यांना पुन्हा आयुक्त पदावर कसा पदभार देण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी देखील केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com