Farmers Suicide : सरकारची चिंता वाढवणारी बातमी! 4 महिन्यांत राज्यात तब्बल 800 हून अधिक शेतकऱ्यांची आत्महत्या

838 Farmers Committed Suicide : चार महिन्यांत दररोज सरासरी सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. विदर्भातील अमरावती विभागामध्ये सर्वाधिक 383 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
Farmers Suicide
Farmers Suicide sarkarnama

Farmers Suicide News: राज्यात अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीतमध्ये 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी ते एप्रिल 2024 या चार महिन्याच्या कालावधीतील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ही आकडेवारी आहे. जानेवारी महिन्यास सर्वाधिक 235 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले.

जानेवारी महिन्यात 235, फेब्रुवारीत २०८, मार्चमध्ये 215 आणि एप्रिलमध्ये 180 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील शेतकरी आत्महत्येचे पडसाद उमटत आहेत.

चार महिन्यांत दररोज सरासरी सात शेतकऱ्यांनी आत्महत्या Farmers Suicide केल्याची प्राथमिक माहिती आहे. विदर्भातील अमरावती विभागामध्ये सर्वाधिक 383 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून छत्रपती संभाजीनगर विभागात 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नागपूर विभागात 84 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.कोकणात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण शून्य आहे. तर सर्वाधिक आत्महत्या अमरावती आणि यवतमाळमध्ये केल्या गेल्या आहेत.

Farmers Suicide
Mahavikas Aghadi News : शिवसेना अन् राष्ट्रवादीकडून होणार काँग्रेसची कोंडी?

या चार महिन्यांत अमरावतीमध्ये ११६, यवतमाळमध्ये १०८, वाशिममध्ये ७७, जळगावमध्ये ६२, बीडमध्ये ५९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४, धाराशिवमध्ये ४२, वर्धामध्ये ३९, नांदेडमध्ये ४१, बुलढाण्यात १८, धुळ्यामध्ये १६, तर अहमदनगरमध्ये १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

104 शेतकरी कुटुंबांना मदत

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या फक्त 104 कुटुंबीयांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून देण्यात आल्याची माहिती आहे. तर 62 शेतकरी आत्महत्या प्रकरणे फेटाळण्यात आली आहेत. त्याचबरोबर 605 शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये कागदपत्रांची तपासणी सुरू आहे.

शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे सरकारचे Government लक्ष नसल्याचा आरोप शेतकरी कुटुंबीय करत आहेत. राज्यातील पळवा पळवीच्या राजकारणात लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचे शेतकरी कुटुंबीय म्हणत आहेत.

Farmers Suicide
Parliament Session Live : राहुल गांधींचा ‘तो’ मुद्दा अन् विरोधकांचा गोंधळ; संसदेचे कामकाज करावे लागले स्थगित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com