Eknath Khadse Replied Fadanvis: मुख्यमंत्री लेव्हलच्या माणसाने...: फडणवीसांच्या टिकेला खडसेंचं प्रत्युत्तर

Jalgaon Politics: एकनाथ खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती. अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी खडसेंवर टिका केली होती.
Eknath Khadse Replied Fadanvis:
Eknath Khadse Replied Fadanvis:Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : "मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस, मुख्यमंत्री राहिलेला माणूस, त्याने काय शब्द वापरावे , काय बोलावं हे कळलं पाहिजे," अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. ''जर एकनाथ खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती. नवीन मालकाकडे जावं लागलं नसतं, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मंगळवारी खडसेंवर टिका केली होती.

फडणवीसांच्या या टिकेला एकनाथ खडसेंनी उत्तर दिलं आहे. "फडणवीस हे तणावात असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री लेव्हलचा माणसाने काय शब्द वापरावेत, काय बोलायला पाहिजे,हे कळलं पाहिजे, अशी टीका खडसे यांनी केली आहे.

Eknath Khadse Replied Fadanvis:
Raj Thackeray : तरुणीवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन ; ' प्रशासनाकडून कायद्याचा धाक..'

मला म्हणाले, जमिनीत तोडं काळं केलं नसतं तर, पण जमिनीचा व्यवहार हा कायदेशीर होता. माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता. पण, मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्यानेच यांनी मला घोटाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण जगाला माहिती आहे. मी कोणताही गैरव्यवहार मी केला नाही. मी जमीनच खरेदी केली नाही तर जमिनीत तोंड काळ करण्याचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Khadse-Fadanvis dispute)

पण आयुष्यभर तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले तेच आज मंत्रिमंडळात तुमच्या शेजारी बसले आहेत. अशा लोकांना घेऊन तुमचं मंत्रिमंडळ बनवलं तर तुम्ही त्यांच्या विरोधात का बोलत नाहीच. तोंड काळं केलं ही हिरवं केलं यापेक्षा यापेक्षा कापसाला किती भाव दिला, हे सांगा. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याऐवजी याचं तोंड काळ केलं, त्याचं तोंड काळ केलं हे बोलण्यात काय अर्थ आहे, असा खोचक टोलाही एकनाथ खडसेंनी लगावला आहे. (Maharashtra Politics)

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com