Raj Thackeray : तरुणीवरील जीवघेण्या हल्ल्यानंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आवाहन ; ' प्रशासनाकडून कायद्याचा धाक..'

Pune crime News : . जीव मुठीत घेऊन पळत सुटली. तिचा मित्रही कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता.
Raj Thackeray News
Raj Thackeray News Sarkarnama

Mumbai News : पुण्यातील सदाशिव पेठेत काल (मंगळवारी) तरुणीवर एका तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.एकतर्फी प्रेमातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. (Crime News) या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. (raj thackeray tweet on pune attack on young women)

तरुणीवर हल्ला झाल्यानंतर आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीला धावलेल्या लेशपाल जवळगे या तरुणाचं राज ठाकरे यांनी कौतुक केलं आहे.

Raj Thackeray News
Sachin Sawant arrest : मोठी बातमी : सचिन सावंत यांना ईडीकडून अटक ; नातेवाईकांची चौकशी सुरु..

दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे, असे टि्वट राज ठाकरे यांनी केलं आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी लक्ष ठेवा, वेळीच धावून जा, असे राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना सांगितले.

संबंधित तरुणी सकाळी कॉलेजला निघाली होती.यावेळी तरुणीसोबत तिचा दुसरा मित्रही होता. सदाशिव पेठेतून जात असताना तरुण त्यांच्या मागून आला आणि अचानक तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी तरुणाने , तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केल्याने ती जखमी झाली. जीव मुठीत घेऊन पळत सुटली. तिचा मित्रही कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता. ती मदत मागत होती. पण तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही.

Raj Thackeray News
Balasaheb Thorat :..तर तो देशातला सर्वात मोठा विजय असेल; बाळासाहेब थोरातांना विश्वास

ती पळत असताना लेशपाल जवळगे हा तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर वार करणार एवढ्यात लेशपाल जवळगेने त्याला रोखलं. यानंतर इतर लोक पुढे सरसावले आणि हल्लेखोराला चोप दिला. उपस्थितांनी या प्रकाराची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतलं.

राज ठाकरेंनी टि्वटमध्ये म्हणतात..

काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं.

अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं. दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे.

सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com