Aaditya Thackeray Politics: शिवसेना नेते आदित्य ठाकरे बचावले, सत्कार प्रसंगी व्यासपीठ खचले!

Aaditya Thackeray Stage Accident: नाशिकच्या शिवसेना निर्धार शिबिरात आदित्य ठाकरेंच्या स्वागताला झाली कार्यकर्त्यांची रेटारेटी.
Aaditya Thackeray
Aaditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aaditya Thackeray News: शिवसेनेचे पहिले निर्धार शिबिर नाशिकला झाले. या शिबिराला मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे या कार्यक्रमात एक अपघात घडला. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही.

शिवसेना निर्धार शिबिरात शिवसेना नेते आदित्य ठाकरे आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी झुंबड उडाली. एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते आदित्य ठाकरे यांच्या सत्कारासाठी व्यासपीठावर जमले होते. त्यामुळे नियोजन देखील कोलमडले.

Aaditya Thackeray
Satpeer Dargah : नाशिकमधील दर्ग्यावरील कारवाई महापालिकेच्या अंगलट येणार? सर्वोच्च न्यायालयाने दिले स्थगितेचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

हा सत्कार सुरू असतानाच प्रचंड गर्दीमुळे व्यासपीठ खचले. आदित्य ठाकरे व्यासपीठावर असतानाच व्यासपीठाचा काही भाग कोसळला. अचानक घडलेल्या या अपघाताने उपस्थित त्यांनाही धक्का बसला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाली नाही शिवसेना नेते ठाकरे बचावले.

Aaditya Thackeray
Maharashtra Cabinet Meeting : फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; 65 वर्षांनंतर पहिल्यांदाच 1500 लोकसंख्येच्या 'या' गावात होणार कॅबिनेट बैठक

शिवसेनेने सध्या आपली कार्यपद्धती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणूनच नाशिक शहरात निर्धार शिबिर घेण्यात आले. या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांचा हा नाशिकचा पहिलाच दौरा होता.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी या शिबिराची संकल्पना कार्यकर्त्यांना सांगितली. शिवसेनेला सभा आणि मेळाव्यांची सवय आहे. शिबिराची सवय नाही. त्यांच्यासाठी पहिल्यांदाच असे दिवसभर चालणारे शिबिर झाले होते. त्या दृष्टीने शिवसेना कार्यकर्त्यांसाठी देखील हा एक वेगळा अनुभव होता.

या निमित्ताने विरोधी पक्षांकडून शिवसेना विरोधात सुरू असलेले डावपेच कसे परतावून लावायचे यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिवसेनेत सुरू असलेली गळती रोखण्यासाठी देखील हा उपक्रम होता.

त्यात विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेतच का राहावे यावर मार्गदर्शन केले. आर्टिफिशल इंटेलिजन्स चा वापर करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवरील भाषण या शिबिरातील वेगळेपण होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com