Arvind Kejriwal and Sharad Pawar: अरविंद केजरीवाल अन् शरद पवारांना एकाच दिवशी दिल्लीत दणका

Political News: 'आप' खासदार तुरुंगात तर राष्ट्रवादीचे फैजल लोकसभेतून बाहेर
Arvind Kejriwal and Sharad Pawar
Arvind Kejriwal and Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Delhi News:  दिल्लीत आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. एकीकडे आम आदमी पक्षाचे (AAP) खासदार संजय सिंह यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली. तर दुसरीकडे लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले. यामुळे 'आप'चे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एकाच दिवशी मोठा धक्का बसला.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात संजय सिंह यांच्या निवासस्थानावर बुधवारी सकाळीच ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर त्यांची तब्बल 10 तासांच्या चौकशीनंतर संजय सिंहांना ईडीकडून अटक करण्यात आली. या विरोधात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे दिल्लीत राजकीय वातावरण तापलं.

Arvind Kejriwal and Sharad Pawar
ED Action On Sanjay Singh : मोठी बातमी ! दिल्लीतील मद्य घोटाळ्यात खासदार संजय सिंहांना ईडीकडून अटक

तर दुसरीकडे लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतून निलंबन करण्यात आले. फैजल यांची एकाच वर्षात दोनदा खासदारी रद्द झाली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात फैजल यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी त्याना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेला स्थगिती मिळाण्यासाठी त्यांनी केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यांची ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. यामुळे मोहम्मद फैजल यांना 10 वर्षांची शिक्षा झाल्याने त्यांचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलं.

Arvind Kejriwal and Sharad Pawar
Mohammad Faizal Case: मोठी बातमी ! राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांचं लोकसभेतून निलंबन

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटाचा राजकीय संघर्ष थेट निवडणूक आयोगात पोहचला आहे. आता 6 ऑक्टोबरला राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. मात्र, त्याआधीच मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द झाल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

मोदी-शाहांना सत्तेपासून रोखण्यासाठी विरोधकांनी 'इंडीया आघाडी'ची स्थापना करत 2024 च्या लोकसभेची रणनीती आखली आहे. या आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा देखील समावेश आहे.

आघाडीतील नेत्यांनी देशातील महत्वाच्या शहरात बैठका घेत आगामी प्लॅनही आखला आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांचे लोकसभेतून निलंबन तर 'आप'चे खासदार संजय सिंह तुरुंगात गेल्याने केजरीवालांसह पवारांना एकाच दिवशी मोठा धक्का बसला आहे.

Edited by Ganesh Thombare

Arvind Kejriwal and Sharad Pawar
Pankaja Munde News : कारखान्याला मदत टाळली अन् जीएसटीने कारवाई केली; पण पंकजा मुंडेंनाच मिळतोय बूस्ट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com