Aamshya Padvi Politics: एकनाथ शिंदे यांच्या `या` आमदारासह १०० जणांविरोधात पोलिसांची कारवाई...

Aamshya Padvi; newly elected Eknath Shinde's MLA Aamshya Padvi in trouble-काँग्रेसचे माजी आमदार के. सी. पाडवी यांचा पराभव केलेल्या आमदाराची महिलांना हाणामारी केल्याची तक्रार
Amshya Padvi
Amshya PadviSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: विधानसभा निवडणूक निकालाचे पडसाद आता उमटू लागले आहेत. एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आमच्या पाडवी आणि त्यांच्या शंभर सहकाऱ्यांनी महिलांसह आदिवासींना बेदम मारहाण केली. त्यामुळे अक्कलकुवा मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार आमश्या पाडवी आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. आमदार पाडवी यांच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मारहाण आणि दंगलीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महिलांनी त्यांच्या विरोधात तक्रार केली आहे.

Amshya Padvi
Raj Thackrey Politics: विधानसभेच्या अपयशानंतर महापालिकेसाठी `मनसे`ची राज ठाकरेंवर भिस्त!

सोरापाडा (नंदूरबार) येथे पंचायत समिती सदस्य सुधीर गंगाराम पाडवी यांच्या घराजवळ रस्त्याचे काम सुरू होते. हे काम आमदार पाडवी यांच्याशी संबंधित होते. संबंधित काम योग्य प्रकारे होत नसल्याची नागरिकांची तक्रार होती. त्यामुळे अनेकांनी याबाबत संबंधित कंत्राटदाराला सांगण्याचा प्रयत्न केला.

Amshya Padvi
Election Commission : EVM हॅक होऊ शकतच नाही कारण...; विरोधकांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं मोठं स्पष्टीकरण

यावेळी पंचायत समिती सदस्य सुधीर गंगाराम पाडवी आणि अन्य नागरिकांनी रस्त्याचे खोदकाम व्यवस्थित करून नंतर त्यावर पेव्हर ब्लॉक बसवावे, अशी सूचना केली. त्याचा राग आल्याने संबंधित महिला आणि नागरिकांना आमदार पाडवी तसेच त्यांचे चिरंजीव अंजू आमश्या पाडवी, चेतन ओजू पाडवी, फुलजी पाडवी. मंगल विरसिंग पाडवी आणि अन्य लोकांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर मोठा जमाव जमविण्यात आला. त्यात संबंधित महिला आणि नागरिकांना बेदम मारहाण करण्यात आली. महिलांना लज्जा उत्पन्न होईल, असे हावभाव करून धमकावण्यात आले. जातिवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. गावामध्ये मोठा तणाव निर्माण झाला.

दिवसभर या प्रकाराची चर्चा सुरू होती. त्यानंतर संबंधित महिलांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी याबाबत आमदार पाडवी यांसह शंभर जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, आता त्याचा तपास सुरू आहे.

या वादाला विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा संदर्भ असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अक्कलकुवा येथे गेली ३५ वर्ष काँग्रेसचे के. सी. पाडवी हे आमदार होते. यंदा भाजपच्या पराभूत खासदार हिना गावित यांनी येथून अपक्ष उमेदवारी केली होती. अन्य एका उमेदवाराने ही अपक्ष उमेदवारी केली. या मत विभागणीत शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार आमश्या पाडवी हे विजयी झाले.

या निवडणुकीतील वादविवादाचे पडसाद सातत्याने उमटत आहेत. शुक्रवारी रात्री या संदर्भात झालेल्या मोठ्या हाणामारीच्या प्रकरणाने निवडणुकीतील हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार अडचणीत येण्याची शक्यता आहे. अक्कलकुवा येथे घडलेल्या प्रकरणाने नंदुरबार जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले आहेत.

अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत हिना गावित यांना अतिशय कमी मते मिळाली होती. त्या राजकीय पराभवाचा वचपा म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन या मतदारसंघातून मत विभागणी करण्याचा डाव आखला होता. त्या अपक्ष उमेदवार होत्या. त्याची झळ काँग्रेसचे आमदार के. सी. पाडवी यांना बसली. शिवसेना शिंदे पक्षाचे विधान परिषद सदस्य आणि महायुतीचे उमेदवार आमश्या पाडवी या मत विभागणीचा फायदा घेत अल्प आघाडी घेऊन विजयी झाले होते. त्यामुळे या राजकीय वादविवादाचा या हाणामारीशी संबंध तर नाही ना, अशी ही चर्चा सुरू झाली आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com