Jalgaon : कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सत्तार हे धरणगाव तालुक्यात आले होते.
यावेळी त्यांच्या वाहनावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून कापूस फेकण्यात आला. तसेच '५० खोके, एकदम ओके', अशी घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आले.
राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवरच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अब्दुल सत्तार हे आज नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
या दौऱ्यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच जळगावमधील धरणगाव तालुक्यातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सत्तार जात असताना त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कापूस फेकला.
तसेच '50 खोके एकदम ओके' अशी घोषणाबाजी करत रिकामे खोके आणि कापूस फेकत त्यांचा निषेध व्यक्त केला. मात्र, पोलीसांनी मध्यस्थी करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बाजुला केलं. त्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या वाहनाचा ताफा पुढे गेला.
दरम्यान, या प्रकारामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी अवघ्या दहा मिनिटांत आटोपली. कृषीमंत्र्यांनी अवघ्या दहा मिनिटांत नुकसानग्रस्त भागाची पाहणी आटोपल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.