Advay Hire Politics: "पणन मंत्री सत्तार बाजार समित्यांना ब्लॅकमेल करायचे असावे"

Advay Hire Criticize Minister Abdul Sattar and State Government: शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली.
Advay Hire, APMC agitation
Advay Hire, APMC agitationSarkarnama
Published on
Updated on

Hire Vs Sattar News: पुणे येथे झालेल्या राज्यातील बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे राजकीय कवित्व संपलेले नाही. यासंदर्भात पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका होत आहे. राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका करण्यात आली.

पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेच्या निषेधार्थ काल राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये बंद पाळण्यात आला. मालेगाव येथे समितीचे अध्यक्ष डॉ अद्वय हिरे यांनी बाजार समितीच्या आवारात संचालकांसह धरणे धरले. सोमवारी जिल्ह्यातील बाजार समित्या बंद होत्या.

पुणे येथे झालेला राज्यातील बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि त्यामध्ये शासनाने समित्यांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष यामुळे समित्यांचे पदाधिकारी नाराज आहेत. राज्य शासनाने हा मेळावा बोलविण्यामागे वेगळीच भूमिका होती.

शासनाला बाजार समित्यांना ब्लॅकमेल करायचे होते. कारण राज्यातील बहुतांशी बाजार समिती बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वेगळ्याच हेतूने हा मेळावा बोलवला होता, असा आरोप होत आहे.

Advay Hire, APMC agitation
Bhanudas Murkute : माजी आमदार मुरकुटे अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक, काय आहे प्रकरण...

या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री दौरा निश्चित असतानाही जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. पणन मंत्र्यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांचे काहीही न ऐकता तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे राज्यभर नाराजी आहे. पणन मंत्री निघून जाऊ लागल्याने त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, असे हिरे म्हणाले

श्री हिरे यांनी महायुतीच्या सरकारवर टीका केली. पणन मंत्री सत्तार हे खाजगी बाजार समित्यांच्या हितासाठी काम करीत आहेत. खाजगी बाजार समितीकडे कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत. स्वतःच्या जागा नाहीत. त्यांच्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास जबाबदार कोण?

केवळ नकारात्मक भूमिका म्हणून सहकारी बाजार समिती संपुष्टात याव्यात यासाठी राज्य सरकार खाजगी बाजार समित्यांना प्रोत्साहन गेत आहे. त्यांना प्रोत्साहन दिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न त्यांनी केला.

Advay Hire, APMC agitation
Sujay Vikhe : लोकसभेतील पराभवात काय चूक झाली; सुजय विखेंनी सांगितली

श्री. हिरे यांनी पणन मंत्री सत्तार यांनी पुणे येथील मेळाव्यात समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकायला पाहिजे होते, अशी अपेक्षा व्यक्त केली. बाजार समित्यांच्या अनेक समस्या आहेत. त्याकडे संबंधित मंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे.

मात्र मंत्र्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण करायचे असावे. म्हणूनच त्यांनी पुण्याची बैठक बोलावली होती. बैठकीतील बहुतांशी पदाधिकारी महाविकास आघाडीचे होते. त्यांच्यावर दबाव आणून किंवा ब्लॅकमेल करून आपला हेतू सरकारला साध्य करावयाचा असावा. मात्र तसे होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आल्यानेच ते अनुपस्थित राहिले.

त्यामुळेच राज्यातील बाजार समित्या बंद ठेवून राज्य शासनाचा निषेध केला आहे. यापासून सरकारने बोध घ्यावा. अदानी, अंबानी यांच्यासाठी सरकार न चालवता सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हिताचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com