ACB Trap News : ३० लाख लाच घेणाऱ्या सहकार उपनिबंधकाच्या घरात सापडले घबाड?

नाशिकचे जिल्हा सहकार उपनिबंधक सतीश खरे यांच्याविषयी अनेक गैरप्रकारांच्या चर्चा सुरु
Satish Khare at ACB Office
Satish Khare at ACB OfficeSarkarnama

Nashik ACB News : जिल्हा सहकार उपनिबंधक सतीश खरे यांना काल तीस लाख रुपये लाच स्विकारताना त्यांच्या निवासस्थानी अटक करण्यात आली. खरे यांच्या घराच्या झडतीत १७ लाखांची रोकड व ४५ तोळे सोने यांसह अनेक संशयास्पद वस्तु सापडल्याचे बोलले जाते. त्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. (There is exitement in the cooperative sector on District)

Satish Khare at ACB Office
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांचा नवीन 'लुक' होतोय व्हायरल, पाहा खास फोटो!

नाशिकचे (Nashik) जिल्हा सहकार (Cooperative) उपनिबंधक सतीश खरे (Satish Khare) यांच्या निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तपासणी केली. त्यात पोलिसांना (Police) १७ लाखांचे रोकड आणि ४५ तोळे सोने तसेच विविध संशयास्पद साहित्य सापडल्याची चर्चा आहे. एव्हढ्या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्याच्या सहकार विभागात खळबळ उडाली आहे. दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराच्या विरोधात पराभूत उमेदवाराने अपील केले होते. या प्रकरणात उपनिबंधकांनी अपीलकर्त्याच्या बाजूने निर्णय देण्यासाठी तीस लाखांची मागणी केली होती. त्यात वकिल असलेल्या साबद्रा यांच्यामार्फत ही मागणी झाली. त्यानंतर संबंधीत उमेदवाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तक्रारदार संचालका विरोधातील सुनावणीमध्ये मदत करण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना सोमवारी (ता.१५) रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. ही कारवाई कॉलेज रोडवरील खरे यांच्या निवासस्थानी केली. लाचखोर खरे याच्यासह खासगी व्यक्तिलाही पथकाने ताब्यात घेतले आहे. यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे

Satish Khare at ACB Office
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाचा नवा अंक; ठाकरे गटाचं दबावतंत्र तर शिंदेंचीही कायदेशीर चाचपणी!

सतीश भाऊराव खरे (५७, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक वर्ग-१, रा. आई हाईट्स, कॉलेज रोड), खासगी व्यक्ती शैलेश सुमातीलाल साभद्रा (३२, रा. उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) अशी दोघा लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या.

जिल्ह्यातील दिंडोरी बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर व वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी व निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा एजंट साभद्रा यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती.

Satish Khare at ACB Office
Gehlot Vs Pilot : राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप? सचिन पायलट यांचा गेहलोत सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम; म्हणाले...

या लाचेची रक्कम घेऊन खरे यांनी तक्रारदारास सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे व त्यांच्या साथीदारास पकडत अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक नारायण न्याहालदे, उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, मनोज पाटील, अजय गरुड यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com