Shivsena News: पूर्व विदर्भात उद्यापासून शिवसंवाद, ठाकरेंच्या सैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न !

Shivsena Uddhav Thackeray : खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत शिवसंवादाचा कार्यक्रम होणार आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ठाकरे गटाचे खच्चीकरण झाले. उद्धव ठाकरे सैनिकांना धीर देण्याचा पूर्ण प्रयत्न करीत आहेत. पण दुसरीकडे शिंदे गटाकडून त्यांना ऑफर येत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात सापडलेले दिसतात.

‘मी खचलो नाही, तुम्हीही खचू नका’, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सैनिकांना सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. पण पुरेसा दिसत नसल्याने आता पूर्व विदर्भात शिवसंवाद साधण्यात येणार आहे. यातून नव्याने बांधणी करण्याचा प्रयत्न ठाकरे गट करणार आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साह कायम ठेवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्यावतीने राज्यभर शिवसंवाद साधण्यात येणार आहे.

नागपूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत शिवसंवादाचा कार्यक्रम होणार आहे. शिवगर्जना कार्यक्रमासाठी विदर्भाची जबाबदारी अरविंद सावंत यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्यासोबत शिवसेना (ठाकरे गट) (Uddhav Thackeray) उपनेते लक्ष्मण वडले, उपनेते अमोल कीर्तीकर, आमदार शिवाजी चोथे, युवानेता पवन जाधव राहणार आहे. नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये शिवसंवाद कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १३ खासदार फोडल्याने शिवसेनेचे (Shivsena) दोन तुकडे झाले आहेत. अनेक नेते व कार्यकर्ते शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे सेनेला सोपविले. त्यामुळे शिवसैनिक चांगलाच धास्तावला आहे. कोणासोबत राहायचे, असा प्रश्न अनेकांसमोर पडला आहे. विदर्भात एकही आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिला नाही.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ठाकरेंपाठीमागची संकटांची मालिका थांबेच ना; आता 'हा' नेता निवडणूक लढवण्यासाठी ठरला अपात्र

रामटेकचे खासदार कृपाल तुमानेही सोडून गेले आहे. त्यामुळे कार्यकर्ते बेचैन झाले आहेत. धनुष्यबाण गेल्यानंतर यात आणखीच भर पडली आहे. मुंबईतून काय आदेश येतात याची सर्व वाट बघत होते. शिवगर्जना कार्यक्रमाच्या निमित्ताने नेते विदर्भात (Vidarbha) येत असल्याने अनेकांना दिलासा मिळाला आहे. आता गर्दी जमवण्याचे आणि कार्यकर्त्यांना पक्षात कायम ठेवण्याचे आवाहन स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com