Aditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी दिला मराठा आरक्षणाचा फाॅर्म्युला, भाजपची कोंडी!

Aditya Thackeray Maratha Reservation : सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच दोन महिन्यात आरक्षण देईल, अशी घोषणा केली होती. त्याचे काय झाले? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
Aditya Thackeray
Aditya Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackrey News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (ठाकरे गट) प्रचाराची सुरुवात करण्यात आली. युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान सभेद्वारे नाशिक येथून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. आज (गुरुवारी) ते येवला येथे शेतकरी मेळावा घेत आहेत.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांची छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली. विंचूर चौफुली येथे त्यांना निवेदन देत मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले.

'दिल्लीचे नायब राज्यपाल बदलायचे होते तर केंद्र सरकारने एका रात्रीत अध्यादेश काढला. वक्फ बोर्ड बाबत देखील असाच अध्यादेश काढण्यात आला. मराठा आरक्षणाच्या विषयावर देखील केंद्र सरकारने असा अध्यादेश काढावा. आम्ही सर्व त्या अध्यादेशाला पाठिंबा देण्यास तयार आहोत.', असे आदित्य ठाकरेंनी मराठा आरक्षणावरून आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलत आदित्य ठाकरे यांनी भाजपची कोंडी केली आहे.

Aditya Thackeray
SamarjitSinh Ghatge News: आधी संकेत, आता करुन दाखवलं; समरजितसिंह घाटगेंनी फेसबुकवरून भाजपचे चिन्ह हटवले

आदित्य ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणाचे आंदोलन अतिशय प्रामाणिकपणे सुरू आहे. समाजाला टिकणारे आरक्षण हवे आहे. त्यासाठी कार्यकर्ते तळमळीने लढा देत आहेत. त्यांची भूमिका योग्य आहे.

'भाजपने यापूर्वी मराठा समाजाला आरक्षणाच्या विषयावर तीन वेळा फसवले आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच दोन महिन्यात आरक्षण देईल, अशी घोषणा केली होती. सध्याच्या मिंधे सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. त्याचे काय झाले याचा खुलासा सत्ताधाऱ्यांनी करावा.', असे आदित्य ठाकरे म्हणाले.

जरांगे पाटील काय भूमिका घेणार?

मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे की नाही, याचा निर्णय 29 ऑगस्टला घेणार होते. मात्र, निवडणूक एक महिना पुढे ढकल्याने. निवडणूका लढण्याविषयीचा निर्णय घेण्याची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.

Aditya Thackeray
Pune Criem News : धक्कादायक! बदलापूर घटनेची पुनरावृत्ती? पुणे जिल्ह्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनींवर अत्याचार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com