Pune Criem News : धक्कादायक! बदलापूर घटनेची पुनरावृत्ती? पुणे जिल्ह्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनींवर अत्याचार

Daund teacher abuse minor students : शिक्षकाने विद्यार्थीनींना व्हाॅट्सअप व्हिडिओ काॅल करून त्यांचे अश्लील फोटो काढत होता. त्याआधारे त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करत होता.
Pune Crime News
Pune Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Criem News : बदलापूरमधील मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पुणे, अकोला येथे घडलेल्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात देखील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सातवी ते नववीमधील तीन ते चार विद्यार्थिनींना इंग्रजी विषयाच्या शिक्षकाने ब्लॅकमेल करत लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी विद्यालयामध्ये जात गुन्हा दाखल केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शिक्षकाने विद्यार्थीनींना व्हाॅट्सअप व्हिडिओ काॅल करून त्यांचे अश्लील फोटो काढत होता. त्याआधारे तो ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. पालकांना याची माहिती मिळाताच त्यांनी विद्यालयात धाव घेत घेत या प्रकराचा जाब विचारला. पोलिसांनी आरोपी शिक्षकाचा मोबाईल जप्त केला आहे.

Pune Crime News
Adv. A.P.Singh : 'निर्भया', 'हाथरस'च्या गुन्हेगारांची बाजू मांडणारे वकील आता कोलकाता बलात्कार प्रकरणातील आरोपीचीही केस लढवणार?

सरकारला खडेबोल

बललापूर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाने सुमोटो दाखल करून घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी आज हायकोर्टात झाली. हायकोर्टाने हा प्रकरणात दिरंगाई केल्याबद्दल पोलिस आणि राज्य सरकारला खडेबोल सुनावले. नागरिक रस्त्यावर उतरल्यावरच एसआयटी नेमणार का? असा संतप्त सवाल देखील कोर्टाने केला होता.

Pune Crime News
MVA News : नागपुरवरुन 'मविआ'त ठिणगी; हायकमांडकडे बोट दाखवत काँग्रेसने केले मोठं विधानं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com