Aditya Thackrey Politics: आदित्य ठाकरेंचे वर्मावर बोट, ‘वक्फ’ला विरोध करणाऱ्या ‘अण्णाद्रमूक’शी भाजपची युती कशी?

Aditya Thackrey; BJP wants to make Maharashtra a Manipur for power-भाजप हा स्वार्थी पक्ष, त्याने सत्तेसाठी भाजपने हिंदुत्व सोडले, असे लवकरच जनतेपुढे येईल.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Aditya Thackrey News: भारतीय जनता पक्षाचे राजकीय धोरण आणि फसवेपणाचे वस्त्रहरण शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आज केले. सेनेच्या निर्धार शिबिरात महाराष्ट्राच्या भावी राजकारणाबाबत त्यांनी कार्यकर्त्यांना सावध केले. परिस्थिती विरोधात असली तरी समाजाला योग्य दिशा देण्याची जबाबदारी शिवसेना पार पाडणार आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज भाजप आणि त्यांच्या सरकारच्या फोलपणाचे वस्त्रहरण केले. भाजप हिदूत्वावादी असल्याचा दावा करतो. मग वक्फ विधेयकाला विरोध केलेल्या तमिळनाडूतील अण्णाद्रमूक पक्षाशी त्यांनी युती कशी केली?. या प्रश्नाचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे, असे आव्हान ठाकरे यांनी दिले.

Aditya Thackeray
Shivsena UBT Politics : पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन ठरला; नाशिकमधील शिबिरात कार्यकर्त्यांना देणार निष्ठेचा मंत्र

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात अडीच वर्ष अपवाद वगळता गेली सहा वर्ष देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. मग राज्यातील महिलांवरील अत्याचार, वाढलेली गुन्हेगारी आणि ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस कसे टाळू शकतात, असा प्रश्न त्यांनी केला.

Aditya Thackeray
Sanjay Raut Video : दर्ग्यावरील कारवाईवर संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, 'बुलडोझर चालवायचा...'

ते म्हणाले, भाजप जिथे जिथे सत्तेत येतो त्या ठिकाणी तो बहुसंख्य समाजाला अथवा एका जातीला दुसऱ्या जातीविरुद्ध लढवत असतो. हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, मणिपुर या सर्व राज्यांमध्ये भाजपने हाच घातक प्रयोग केला आहे. आज महाराष्ट्रात दंगली घडवल्या जात आहेत. जर महाराष्ट्रात गुंतवणूक यायची असेल, तर दंगली झाल्यावर ती येईल का?. उद्योग वाढतील का? लोकांना रोजगार मिळतील का? असा प्रश्न त्यांनी केला.

मणिपूर दोन वर्ष जळत होते. मात्र केंद्रातील सरकारने त्यांच्याच पक्षाचे सरकार असल्याने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. जेव्हा स्थिती हाताबाहेर गेली तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली. महाराष्ट्र देखील असेच वातावरण पेटविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यात सर्वसामान्यांची मुले भरडले जातील. याच मुलांच्या हातून दंगली घडविल्या जाते. भाजप मंत्री आणि नेत्यांची मुले मात्र अमेरिकेत शिक्षणासाठी जातील. सर्वसामान्यांची मुले दंगलीत भरडली जाते, असे धोरण भाजप राबवत आहे.

अमेरिका आणि चीन हे सध्या व्यापारातील टेरिफ वर चर्चा करीत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला टेरीफ लागू करणार, अशी घोषणा केली होती. त्याविरुद्ध बोलण्याचे धाडस भाजपचे आणि नरेंद्र मोदी यांचे नाही. त्यामुळे त्यांनी नेमके याच दिवशी वक्फ विधेयक आणले आणि चर्चा हिंदू-मुस्लिम या विषयाकडे नेली.

महाराष्ट्रावर कोणी हल्ला करतो तेव्हा, महाराष्ट्र त्याला या मातीतच गाडतो, असा आपला इतिहास आणि शौर्य आहे. मात्र या शौर्याचे प्रतीक असलेली औरंगजेबाची कबरच त्यांना उखडून टाकायची आहे. हा विषय भाजपनेच उकरून काढला. कबरीला संरक्षण देखील भाजपचेच आहे. यावरून राजकारण देखील भाजपच करीत आहे. यावर बारीक लक्ष ठेवून हे समजून घेतले पाहिजे. ते पर्यंत भाजपचा हा दुटप्पीपणा आणि विद्रूप चेहरा न्यायला पाहिजे. भाजप हा महाराष्ट्र विरोधी काम करणारा पक्ष आहे. हे काम शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com