Sanjay Raut Video : दर्ग्यावरील कारवाईवर संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, 'बुलडोझर चालवायचा...'

Sanjay Raut First Statement on Nashik Dargah Demolition : संजय राऊत म्हणाले, आम्ही फार काळ सत्तेत नव्हते. आमचा पक्ष हा बाहेर राहून लढणारा पक्ष आहे. ज्यांना सत्तेची चटक होती ते त्यांना जाऊन मिळाले आहेत.
Sanjay Raut
Sanjay Raut sarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News : नाशिकच्या काठे गल्ली परिसरात असलेला अनधिकृत सातपीर दर्गावर मंगळवारी मध्यरात्री कारवाई करण्यात आली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलिस जखमी झाल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, आज नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिबिर होत आहे. उद्धव ठाकरे या शिबिरात मार्गदर्शन करणार आहे.

दर्ग्यावर झालेल्या कारवाईबाबात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले, आमच्या शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दर्गा, मशिद यावरील होत असलेली कारवाई हा याचाच भाग आहे. ते इतर दिवशी कारवाई करू शकले असते मात्र शिबिरावरील लक्ष हटवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

Sanjay Raut
IAS transfers : बदल्यांचा धडाका कायम! 'MMRDA' चा कारभार आस्तिक पांडेंकडे तर सत्यम गांधी सांगली-मिरजचे आयुक्त

मशि‍दींवर बुलडोझर चालवायचा, हे कसले लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, असे चॅलेंजही राऊत यांनी दिले. ते म्हणाले, समोरासमोर लढण्याची आमची तयारी आहे. तुम्ही वातावरण खराब करताय. ज्यांन देश तोडायचा आहे. त्यांनी दर्गे तोडले तर आश्चर्य वाटत नाही, अशी टीका ही राऊतांनी भाजपवर केली.

शिबिरातून दिशा मिळेल...

संजय राऊत म्हणाले, आम्ही फार काळ सत्तेत नव्हते. आमचा पक्ष हा बाहेर राहून लढणारा पक्ष आहे. ज्यांना सत्तेची चटक होती ते त्यांना जाऊन मिळाले आहेत. हा बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा पक्ष आहे. आता निवडणुका नाहीत तरीही आम्ही शिबिर घेत आहोत. या शिबिरातून पक्षसंघटन मजबूत केले जाईल. जनता अस्वस्थ आहे तिला सोबत घेतले जाईल. हे शिबिर दिशा देणारे ठरेल.

एकनाथ शिंदे-राज ठाकरेंची भेट का?

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर देखील भाष्य केले. ते म्हणाले, एकनाथ शिंदेंचा उपवास होता त्यामुळे अमरसपुरी खायला गेले होते. शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत.राज ठाकरेंच्या पक्षाची ध्येय धोरणे देखील दिल्लीतून ठरवली जातात. शहा हे एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा महाराष्ट्रातील तीन पक्षाचे प्रमुख आहेत.

Sanjay Raut
Ranjit Kasle News : चक्र फिरली; पकडून दाखविण्याचे चॅलेंज देणारा कासले पोलिसांना शरण येणार, गुपित उलगडणार...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com