धुळे : शिवसंवाद (Shivsanvad Yatra) यात्रेच्या स्वागतासाठी येथील कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या (Shivsena) चाहत्यांचा अमाप उत्साह, प्रेम पाहून भारावलो आहे. त्याविषयी भावना व्यक्त करण्यास शब्द नाहीत. असेच प्रेम, उत्साह, पाठिंबा कायम राहिला तर शिवसेना अभेद्यच राहील, असा आत्मविश्वास धुळ्यातील (Dhule) वातावरण पाहून दुणावला आहे, अशा शब्दात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहन सर्वच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना केले. (Big crowd in Dhule to welcome Aditya Thackrey in Dhule city)
शिवसंवाद यात्रे अंतर्गत युवा नेते ठाकरे जळगावमार्गे येथील पारोळा चौफुलीवर शनिवारी रात्री साडेआठला दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी तोबा गर्दी होती. विशेषतः तरुण कार्यकर्ते व चाहत्यांची संख्या लक्षणीय होती. शिवसेनेचे स्थानिक सर्व पदाधिकारी, आजी- माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आदेश बांदेकर यांची विशेष उपस्थित होती. उपस्थित उत्साही जमाव शांत करण्यासाठी युवा नेते ठाकरे यांनाच पुढाकार घ्यावा लागला. त्यांची छबी मोबाईलमध्ये बंदीस्त करण्यासाठी असंख्य तरुण कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ लागली, तर काहींनी संधी साधत सेल्फी घेतला.
युवा नेते ठाकरे म्हणाले, धुळ्यात शिवसंवाद यात्रेचे झालेले स्वागत पाहून भारावलो तर आहेच, शिवाय याच आशीर्वादाच्या बळावर राज्यात शिवसेना अभेद्य राहील, असा दृढविश्वास आहे. एकीकडे असा उत्स्फूर्त पाठिंबा आम्हाला मिळत असताना शिवसेनेशी गद्दारी करत बाहेर पडलेल्यांकडे खोके, ५० कोटी रुपये आले कुठून? त्यांना शिवसेनेचे निष्ठावंत धडा शिकवतील. असे निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेच्या पाठीशी राहणार असल्याने गद्दारांचे राज्यात स्थापन झालेले सरकार कोसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. ज्यांच्याकडे खोके नाहीत, मात्र निष्ठा आहे, जनतेविषयी संघर्षाची तयारी व प्रेम आहे, अशांना जिंकून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी झोकून काम करावे.
राज्यात सध्या घाणेरडे राजकारण दिसते आहे. राज्याचे राजकारण स्वच्छ, प्रामाणिक असले पाहिजे. त्यासाठी शिवसेना, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे झटत आहेत. दुसरीकडे गद्दार शिवसेना व ठाकरे यांना संपवायची भाषा करत आहेत. त्यांना धडा शिकविण्यासाठी आपणा सर्वांना खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, अशा आशयाची भूमिका युवा नेते ठाकरे यांनी मांडली. नंतर ते मालेगावकडे रवाना झाले.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.