Kirit Somaiya Politics: धक्कादायक...मालेगाव आणि पश्चिम बंगालमध्ये आहे हे कनेक्शन!

Adv. Shishir Hiray; government leader claims, Bangladeshi citizen got certificates ine Malegaon-बांगलादेशी नागरिकांनी मालेगाव शहरातून बनावट दाखले घेतल्याचा पुन्हा एकदा दावा करण्यात आला आहे.
Kirit Sommaiya, Maulana Mufti  & Mushtaq Dignity
Kirit Sommaiya, Maulana Mufti & Mushtaq DignitySarkarnama
Published on
Updated on

Malegaon Politics: मालेगाव शहर बनावट दाखले मिळविण्याचे केंद्र बनले होते. या संदर्भात सुरू असलेल्या तपासणीत काही गैरप्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे मालेगाव शहर हे पुन्हा एकदा भाजपसाठी 'सॉफ्ट पॉलिटिक्स'चे केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगाव शहरातून चार हजार बनावट दाखले दिल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी पोलिसांना यादीत सादर केली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विशेष तपासणी पथक नियुक्त करण्यात आले. या पथकाकडून अद्यापही तपासणीचे काम सुरू आहे.

Kirit Sommaiya, Maulana Mufti  & Mushtaq Dignity
Nagpur Politics: 112 कोटींच्या घोटाळ्याने बुडाले नागपूर जिल्हा बँकेंचे जहाज? सहकार विभागाचा दाव्याने फडणवीस-केदार वादाला फोडणी

मालेगाव शहरात अद्याप एकही बांगलादेशी नागरिक सापडलेला नाही. मात्र या संदर्भात सरकारी वकील ॲड शिशिर हिरे यांनी वेगळाच दावा केला आहे. मालेगाव शहरातून काही बांगलादेशी नागरिकांनी दाखले घेतल्याचे पुरावे सापडल्याचा त्यांचा दावा आहे. सध्या याबाबत काही पुरावे सापडले आहेत. ते पुरावे पोलिसांना सुपूर्त केल्याचे त्यांनी सांगितले.

Kirit Sommaiya, Maulana Mufti  & Mushtaq Dignity
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या 'त्या' भूमिकेनंतर नाशिकमध्ये मनसेने घेतले नवे आंदोलन हाती

महानगरपालिका आणि महसूल विभागाच्या तहसीलदार कार्यालयातून या प्रकारचे दाखले देण्यात आले आहेत. मालेगावमध्ये जन्म झालेला नसतानाही काही जणांना दाखले देण्यात आले. यातील काहींनी त्या दाखल्यांच्या आधारे पासपोर्ट तयार केल्याचे उघड झाले आहे. या दाखल्यांचा गैरप्रकार झाल्याचा त्यांचा दावा आहे.

आतापर्यंत अल्पशिक्षित आणि कागदपत्र नसल्याने एजंटमार्फत जन्म दाखले मिळविल्याचे प्रकार पुढे आले होते. सुमारे चार हजार दाखल्यांची तपासणी आतापर्यंत झाली आहे. यामध्ये २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. तहसीलदार आणि त्यांच्या सहाय्यकासह चार जणांना निलंबित करण्यात आले आहे.

एसआयटीच्या तपासातून मालेगाव हे सहज दाखले उपलब्ध होण्याचे ठिकाण ठरले होते. महाराष्ट्रातील बनावट दाखले देण्याचे केंद्र म्हणून मालेगावचा उल्लेख होत होता. त्याचा गैरफायदा काही स्थानिक एजंट तसेच बांगलादेशी नागरिकांशी संबंध असलेल्यांनी घेतल्याचे येत्या काही दिवसात तपासातून स्पष्ट होऊ शकते, असा दावा सरकारी वकिल अॅड. हिरे यांनी केला आहे.

यामध्ये बांगलादेशातून भारतात प्रवेश केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये या नागरिकांना बनावट दाखले देण्याचे केंद्र आहे. येथून कागदपत्र मिळविल्यानंतर हे बांगलादेशी नागरिक देशाच्या विविध भागात जातात. असेच दाखले मालेगाव शहरातही दिले गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेशी कनेक्शन बाबत मालेगाव आणि पश्चिम बंगाल यामध्ये कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे

-----------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com