Shivsena UBT Politics: धुळ्यात शिवसेना ठाकरे पक्ष लागला निवडणुकीच्या तयारीला, काय असेल रणनीती?

Advay Hiray; Shivsena Uddhav Thackeray followers ready to fight with BJP-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाने धुळे महापालिकेवर लक्ष केंद्रित केले
Advay Hiray
Advay HiraySarkarnama
Published on
Updated on

Advay Hiray News: धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात पक्षाने तीन नेत्यांची नियुक्ती केली आहे. या नेत्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची आढावा बैठक होऊन भाजपला पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

आगामी धुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याचा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे. निवडणूक जाहीर होण्याची प्रतीक्षा न करता आतापासूनच प्रत्येकाने सक्रिय झाले पाहिजे. ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन संपर्क वाढवावा, असे आवाहन शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी केले.

निवडणुकीत भाजपसह शिवसेनेच्या विरोधकांशी दोन हात करण्यासाठी पक्ष तयार आहे. भाजपकडे साधन संपत्ती असली तरीही त्यांच्याकडे समाजकारण आणि लोकांप्रतिनिष्ठा याचा अभाव आहे. त्यामुळे जनता सत्ताधारी पक्षाला वैतागली आहे. निवडणुकीत त्यांना निश्चितपणे जनता घरी पाठवील असा विश्वास यावेळी माजी आमदार गोटे यांनी व्यक्त केला.

Advay Hiray
Nandurbar Politics: भाजप आमदारानं शिवसेना आमदाराच्या पुत्राला केलं गेट आऊट; भांडे वाटपावरून जुंपली!

शहरात संपर्कप्रमुख माजी आमदार अशोक धात्रक, उपनेते अद्वय हिरे, उपनेत्या शुभांगी पाटील आणि माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत निवडणुकीची आढावा बैठक झाली. आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेच्या ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे तयारीला लागावे. या संदर्भात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा वाचपा या निवडणुकीत काढावा असे आवाहन करण्यात आले.

Advay Hiray
Satyajeet Tambe On Devendra Fadnavis : लवकर देवेंद्रजींना भेटणार, सत्यजीत तांबेंनी सांगितलं कारण

शिवसेना नेते संजय राऊत प्रत्येक जिल्हास्तरीय बैठकांसाठी उपस्थित राहणार आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट मतदारांमध्ये जाऊन राज्य सरकारच्या जनविरोधी कामांचा पर्दाफाश करावा. या निवडणुकीत पराभूत करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे, असे उपनेते अद्वय हिरे यांनी सांगितले.

धुळे जिल्हा परिषदेसह महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. जिल्ह्यात जयकुमार रावल हे भाजपचे मंत्री आहे. या परिस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सर्वात आधी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

महाविकास आघाडीचे विविध नेते महायुतीच्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षात दाखल झाले आहेत. स्थितीत कार्यकर्त्यांना अधिक परिश्रम करण्यासाठी मनोबल वाढविण्याचे गरज आहे. तसे प्रयत्न शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सुरू केले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्ष भाजपला कसा आव्हान देतो हे रंजक ठरणार आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com