Satyajeet Tambe On Devendra Fadnavis : लवकर देवेंद्रजींना भेटणार, सत्यजीत तांबेंनी सांगितलं कारण

MLA Satyajeet Tambe Urges BJP CM Devendra Fadnavis to Start Happiness and Positivity Department in Maharashtra : आमदार सत्यजीत तांबे Reflections on Happiness & Positivity हे पुस्तक सध्या वाचत आहेत.
Satyajeet Tambe On Devendra Fadnavis 1
Satyajeet Tambe On Devendra Fadnavis 1Sarkarnama
Published on
Updated on

Happiness and Positivity department Maharashtra : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस नेतृत्व राहुल गांधी यांच्यावर टीका करताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राबवत असलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक केले.

CM फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना देत असलेला अ‍ॅक्सेसचं कौतुक करताना, देवेंद्र 3.O या सरकारमध्ये नवीन विधायक उपक्रम सुरू असून, त्यात हॅपिनेस अ‍ॅण्ड पाॅझिटिव्हीटी चान्स आहे. त्यामुळे दुबईमधील सरकारच्या धर्तीवर असं खातं देवेंद्र यांच्या सरकारमध्ये सुरू करावं, अशी आपण मागणी करणार असल्याचे आमदार तांबे यांनी म्हटलं.

आमदार सत्यजीत तांबे यांन सकाळ माध्यम समहूच्या 'सरकारनामा' डिजिटलशी संवाद साधताना दुबईमधील शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांच्या सरकारमध्ये हॅपिनेस अ‍ॅण्ड पाॅझिटिव्हीटी विभाग आहे. शेख मोहम्मद यांनी हा विभाग सुरू केलं असून, नागरिकांचं हॅपिनेस हा सरकारचा उद्देश असला पाहिजे, असं त्याचं म्हणणं आहे. त्याच धर्तीवर देवेंद्र 3.O (Devendra Fadnavis) या सरकारमध्ये नवीन विधायक उपक्रम पाहायला मिळत आहे, याकडे आमदार तांबे यांनी लक्ष वेधलं आहे.

दुबई सरकारचे शासक शेख मोहम्मद यांनी लिहिलेलं Reflections on Happiness & Positivity, हे पुस्तक सध्या आमदार तांबे वाचत आहेत. या पुस्तकाचा संदर्भ देताना, दुबई सरकार जगात, असं पहिलं सरकार आहे की, त्यांनी डिपार्टमेंट ऑफ हॅपिनेस हे खातं सुरू केलं आहे. त्यांचे म्हणणे आहे की, नागरिकांचं हॅपिनेस हा सरकारचा हेतू असला पाहिजे, अशी तिथल्या सरकारची धारणा आहे. ते नागरिकांच्या हॅपिनेससाठी कसं काम करत आहेत, त्यावर ते पुस्तक आहे. हे पुस्तक मी देवेंद्रजींना देखील लवकरच भेट देणार आहे, असे सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी म्हटलं.

Satyajeet Tambe On Devendra Fadnavis 1
Satyajeet Tambe Vs Amir Shaikh : भाजपची 'बैसाखी' घेत, सत्यजीत तांबेंनी काँग्रेसशी गद्दारी केली; अमीर शेख यांनी 'AB' फॉर्म किस्सा सांगत बुरखा फाडला (VIDEO)

देवेंद्रजीच्या सरकारमध्ये शंभर दिवसांचा कार्यक्रम किंवा आता येऊ घातलेले उपक्रम पाहिल्यास, देवेंद्र 3.O मध्ये जे काही नवी विधायक उपक्रम चालू आहेत, त्यात हॅपिनेस आणि पाॅझिटिव्हीला चान्स आहे, त्यामुळे त्यांना हे पुस्तक भेट देणार आहे, हे सांगताना युवकांनी, तरुणांनी इतिहास समजून घेण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजे. छावा, मृत्यूजंय अशी काही पुस्तकं असतील की, इतिहास वाचला पाहिजे, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

Satyajeet Tambe On Devendra Fadnavis 1
Satyajeet Tambe Rahul Gandhi : राहुल गांधींनी यांना 'गुड मॉर्निंग', 'गुड नाईट', असा मेसेज करावा का? 'NSUI'चे शेख यांनी आमदार तांबेंना धू-धू धुतले (VIDEO)

भारताच्या स्वातंत्र्य लढाचा इतिहास सांगणारी पुस्तकं आहेत. त्यात महात्मा गांधी यांचे सत्याचे प्रयोग, पंडित जवाहरलाल नेहरू यांचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया, गुरुचरण दास यांचं इंडिया अनबाॅऊंड या पुस्तकात भारतातील विविध जाती-धर्माचे लोकं, त्यांची वैशिष्ट्य, विविधतेमध्ये नटलेला भारताचे वर्णन आहे, अशी पुस्तकं वाचली पाहिजे. जगातील लिटरेचर, पर्सनल ग्रोथला मदत करणारे आहे, असे सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com