Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यातील सघर्ष वारंवार दिसून आला. पवार काका - पुतण्यांमध्ये अनेकदा राजकीय वार प्रतिवार, आरोप - प्रत्यारोप झाले. नुकतंच रोहित पवारांनी दावा केला होता की, 'शिरुर मतदारसंघातून आपल्या घरातला उमेदवार अजितदादांना उभा करायचा होता, पण अंतर्गत सर्व्हे खासदार अमोल कोल्हेंच्या बाजूने आल्याने त्यांनी तो निर्णय मागे घेतला.' आता रोहित पवारांच्या या विधानावर अजितदादांना शेलक्या शब्दात झिडकारले आहे. (Lok Sabha Election 2024)
रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या म्हणण्यांनुसार तुम्हाला शिरुरमधून घरच्या उमेदवाराला उभं करायचं होतं का? मात्र परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे हा निर्णय मागे घेतला का? असा सवाल अजितदादांना विचारण्यात आला. यावर अजितदादा म्हणाले, हे धादांत खोटं आहे. रोहितचा थोडा बॅलन्स बिघडला आहे. हल्ली तो काहीपण बडबडायला लागला आहे, अशा शब्दात दादांनी फटकारले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होती असं वक्तव्य शरद पवारांनी केले आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, "शरद पवार यांनी काय भूमिका घ्यावी आणि काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. ते त्यांच्या मनाला वाटतील त्याच गोष्टी करत असतात.
आत्ता आमची भूमिका वेगळी आहे. मात्र कधी कधी संभ्रम अवस्था निर्माण करण्यासाठी अशी वक्तव्ये करण्यात येतात. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील असं मला वाटत नाही. मी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना त्यांना जवळून पाहिला आहे. स्वभाव आणि त्यांची कामाची पद्धत पाहता ते आपला पक्ष विलीन करतील अशी शक्यता मला वाटत नाही."
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.