Nilesh Lanke : आता विषय संपला! खासदार लंके शहाणे झाले, पोलिसांना म्हणाले, 'Sorry'

Ahmednahgar Lok Sabha Election 2024 Result : भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे सत्तेत असल्याने आणि त्यांच्या पुत्र सुजय निवडणुकीच्या मैदानात असल्याने या लढतीचा प्रचंड तणाव प्रशासनावर होता. या लक्षवेधी लढतीमुळे पोलिस दबावाखाली होते. प्रचारसभांमुळे नगर ढवळून निघाले होते.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama

Ahmednahgar Lok Sabha Election : अहमदनगरमधील सुजय विखे आणि नीलेश लंकेमधील 'फाइट' निकाली लागली आणि विखेंचा पाडाव करून लंके खासदार झाले. नीलेश लंके यांनी आता किसको भी कुछ नही बोलने का, अशी भूमिका घेत, पोलिसांना देखील 'Sorry' म्हटले आहे. खासदार झाल्यानंतर लंके शहण्यासारखे वागू लागल्याचे दिसू लागले आहेत.

नगर दक्षिणेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नीलेश लंके आणि भाजपचे सुजय विखे यांच्यात टफ फाइट झाली. निवडणुकीचा काळात प्रचार शिगेला पोहोचला होता. प्रचाराचा प्रत्येक दिवस तणावाचा अनुभूती देणारा होता. भाजप नेते महसूलमंत्री राधाकृष्ण विखे सत्तेत असल्याने आणि त्यांच्या पुत्र सुजय निवडणुकीच्या मैदानात असल्याने या लढतीचा प्रचंड तणाव प्रशासनावर होता. या लक्षवेधी लढतीमुळे पोलिस दबावाखाली होते. कधी काय होईल, याचे नेम नव्हता. प्रचारसभांमुळे नगर ढवळून निघाले होते. प्रत्येक ठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. यातून उमेदवाराशी खटके उडत होते. पोलिसांशी सर्वाधिक खटके उडाले असतील तर, ते नीलेश लंके यांचे!

नीलेश लंके यांनी थेट पोलिसांना अंगावर घेण्यास सुरवात केली होती. पैसे वाटपाच्या आरोपावरून कोतवाली पोलिसांनी (Police) नीलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत गुन्ह्याची नोंद केली. याची माहिती मिळाली तेव्हा नीलेश लंके शहरातील एका चौकसभेत भाषण करत होते. भाषण सुरू असतानाच नीलेश लंके यांना याची माहिती मिळाली. त्यावेळी भर भाषणात नीलेश लंके यांनी त्या पीआय (पोलिस निरीक्षक) याला सांगा, त्यांचा बाप येतोय म्हणून. नीलेश लंके यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. भाजपने यावर प्रचंड टीका केली होती. तसेच पोलिस बाइट संघटनेने निषेध पण नोंदवला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या प्रकारापूर्वी नीलेश लंके यांनी शेवगावमधील प्रचारसभेत पोलिसांना दम भरला होता. शरद पवार यांच्यासमोर हा प्रकार झाला होता. सभेसाठी आलेल्या लोकांना पोलिस अडवत होते, त्यावरून नीलेश लंके पोलिसांवर भडकले होते. त्याचा देखील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचा मतदारसंघात प्रचारावेळी रंगलेला हायव्होल्टेज ड्रामा सर्वांचाच पाहायला मिळाला. पण नीलेश लंके यांनी पोलिसांना अंगावर घेतलेल्याचा ड्रामा सर्वाधिक चर्चेत राहिला.

Nilesh Lanke
Nilesh Lanke : नीलेश लंकेंच्या घातपाताचा होता डाव, मातुश्री शकुंतलांनी दिली 'ही' माहिती

नीलेश लंके आता खासदार झाले आहेत. विजयानंतर त्यांनी समंजस भाषा वापरायला सुरू केली आहे. 'देने वालों का भी भला, न देने वालों का भी भला', असे म्हणू लागले आहे. पोलिसांना देखील 'Sorry' म्हटले आहे. यावर नीलेश लंके यांना जनतेने खासदारकी देऊन शहाणं केले, असे काहींचे म्हणणे आले आहे. नीलेश लंके यांनी पोलिसांना म्हटलेले 'Sorry' पोलिसांना कितपत 'एक्सेप्ट' केले हा देखील चर्चेचा विषय आहे.

Nilesh Lanke
Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe : विखेंसोबत छत्तीसचा आकडा; बाळासाहेबांनी सेलिब्रेशनात जिलेबी वाटली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com