Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe : विखेंसोबत छत्तीसचा आकडा; बाळासाहेबांनी सेलिब्रेशनात जिलेबी वाटली

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : देशात काँग्रेसला मिळालेल्या यशावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा काॅन्फिडंट वाढला आहे. थोरात यांनी काँग्रेसच्या यशाचं सेलिब्रेशन करताना राधाकृष्ण विखेंवर टीका करताना, महायुती भाजप सरकारला आणि विरोधकांना सुनावले आहे.
Balasaheb Thorat, Radhakrishna vikhe patil
Balasaheb Thorat, Radhakrishna vikhe patilsarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Lok Sabha Election : लोकसभेच्या रिंगणात कोणीही आले तरी, नगरवर आपलेच राज्य असेल, अशा थाटात निवडणूक लढणाऱ्या सुजय विखे यांचा नीलेश लंके यांच्यासमोर निभाव लागला नाही. या लढतीत लंकेंनी 30 हजार मतांनी विखेंना पराभवाच्या छायेत ढकलले. विखेंच्या पराभवाची चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच त्यांचा पारंपारिक राजकीय विरोधक बाळासाहेब थोरातांना आनंदच आनंद झाला. बाळासाहेब थोरातांनी विखेंच्या पराभवाचं सेलिब्रेशन जिलेबी वाटून केलं.

देशात आणि राज्यात काँग्रेस, तसेच नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा काॅन्फिडंट उच्चकोटी वाढलाय. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या यशाचं सेलिब्रेशन जिलेबी वाटून करत असतानाच महायुती भाजप सरकारला आणि विरोधकांना कडू बोल सुनावले.

बाळासाहेब थोरात यांनी भाजपने (BJP) देशात आणि राज्यात द्वेषाचं राजकारण केलं. चुकीचा पायंडे पाडून राज्यात आलेले सरकार जनतेला मान्य नाही. जनतेत सरकारकडून सत्तेचा होत असलेल्या गैरवापराचा प्रचंड रोष आहे. बेरोजगारी, महागाई, भरतीमधील गैरव्यवहार, विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार, राज्यात बिघडलेली शांतता-सुव्यवस्था यावर जनेतेचा राग आहे. यातून जनतेचा काँग्रेसच्या शाश्वत विचारांवर विश्वास वाढल्याचे म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या दहशतीच्या राजकारणाला सुजय विखे यांच्या पराभव करत जनतेने उत्तर दिले आहे. प्रशासन चुकीच्या पद्धतीने राबवत असल्याने जिल्ह्यात विखेंविरोधात रोष वाढला आहे. जनतेने विखे यांच्या दहशतीचे झाकण उडवले असून, अजून काही बाकी आहे, ते देखील उडणार आहे, असा चिमटा बाळासाहेब थोरात यांनी विखे यांचे नाव न घेता काढला. विखे यांच्या या रोषाला नीलेश लंके या सामान्य कार्यकर्त्यांनी आव्हान दिले आणि टक्कर देत विखे यंत्रणेविरोधात विजय मिळवला. तसेच भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयामागे संपर्क हेच एकमेव कारण होते. ते खासदार नसताना देखील माझ्या संपर्कात होते. त्याचा फायदा त्यांना झाल्याचे बाळासाहेब विखे यांनी सांगितले.

Balasaheb Thorat, Radhakrishna vikhe patil
Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : राणी लंकेंचे विखेंना 'रिटर्न गिफ्ट'; उत्तरेचं पार्सल उत्तरेला

राज्यात जनता परिवर्तनाच्या दिशेने आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग आणि उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री असताना केलेले काम आवडले. राज्यात सध्याचे सरकार कसे आले हे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री यांना माहित आहे. आता त्यांच्यावर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. देशात, राज्यात काँग्रेसला आणि नगर जिल्ह्यात दोन्ही जागांवर महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाचा जल्लोष बाळासाहेब थोरात यांनी जिलेबी वाटून केला.

Balasaheb Thorat, Radhakrishna vikhe patil
Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : 'राज करने आया मैं, झुकेगा नही'; 'शंभर'च्या स्पीडने लंके दिल्लीकडे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com