Sujay Vikhe V/S BJP : जगताप-कर्डिले-कोतकर ताकदीचा 'खेळ' विखेंना नडला? भाजप निष्ठावंत आणि'विखे यंत्रणे'त जुंपली?

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : नीलेश लंके यांच्या तुलनेत सुजय विखे यांचे सुरवातीपासून पारडे जड होते. विखे यांच्या मदतीनेला थेट विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले होते. मुख्यमंत्री, उपमुख्ममंत्री यांच्यासह आजी-माजी मंत्री प्रचाराच्या मैदानात होते.
Sujay Vikhe Shivaji Kardile Sangram Jagtap Sandeep Kotkar
Sujay Vikhe Shivaji Kardile Sangram Jagtap Sandeep Kotkarsarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Lok Sabha Election : नगर दक्षिणमध्ये भाजप उमेदवार खासदार सुजय विखे यांचा नेमका कोणी गेम केला? यावर 'विखे यंत्रणा' आणि 'भाजप'मध्ये अंतर्गत खदखद सुरू झाली आहे. या पराभवावर निष्ठावान भाजपने विखे यांनी जगताप-कर्डिले-कोतकर यांना बरोबर घेऊन ताकद वाढवण्याच्या केलेल्या प्रयोगाकडं बोट करण्यास सुरवात केली आहे. पराभवाची ही घुसमट ज्वालाभूमीसारखी दबल्यासारखी दिसत असली तरी, ती कधीही बाहेर येवू शकते, आणि कोणाचाही राजकीय बळी घेऊ शकते, एवढ्या टोकाला पोहचली आहे. त्यामुळे भाजपमध्ये वादळापूर्वीचा शांतता घोंगावत असल्याचे दिसते.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात सरळ लढत झाली. या दोघांमधील निवडणूक अटीतटीची असताना, त्यात नीलेश लंके यांनी विजय मिळवला. नीलेश लंके यांच्या तुलनेत सुजय विखे यांचे सुरवातीपासून पारडे जड होते. विखे यांच्या मदतीनेला थेट विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी धावून आले होते. प्रचारसभा घेत नगरकरांना त्यांनी मतदानासाठी आवाहन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आजी-माजी मंत्री देखील विखेंनी प्रचाराच्या मैदानात उतरवले होते.

पंतप्रधान मोदी यांच्या मागेमाग नगरमध्ये भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुजय विखे यांच्याबरोबर होते. माजी आमदार जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, नगर शहरातील आमदार संग्राम जगताप, पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे, विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे, श्रीगोंद्यातील आमदार बबनराव पाचपुते अशी मोठी राजकीय फौज सुजय विखे यांच्या बाजूने होते.

याशिवाय पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची असलेल्या 'विखे यंत्रणे'चा दबदबा वेगळाच होता. तसेच भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते देखील ग्राऊंड पातळीवर होते. असे असताना देखील खासदारकीच्या निवडणुकीत पहिल्यादांचा समोरे जात असलेल्या नवख्या नीलेश लंके यांनी सुजय विखे यांना पराभवाची धुळ चारली. त्यामुळे भाजप आणि विखे यंत्रणेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujay Vikhe Shivaji Kardile Sangram Jagtap Sandeep Kotkar
Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe : विखेंसोबत छत्तीसचा आकडा; बाळासाहेबांनी सेलिब्रेशनात जिलेबी वाटली

भाजपच्या नगर शहरातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी विखे आणि 'विखे यंत्रणे'वर पराभवाचं खापर फोडण्यास सुरूवात केली आहे. कोणी पुढे आले नसले तरी, अंतर्गत कहल सुरू झाला आहे. विखे यांनी जगताप-कर्डिले-कोतकर यांना बरोबर घेत ताकद वाढवली होती. विखे यांनी ही ताकद बरोबर घेऊन निष्ठावान भाजपवर विश्वास दाखवला नाही, असाच काहीसा मेसेज गेला. त्यामुळे निष्ठावान भाजप काहीशी अलर्ट झाली.

विखे यांच्या पराभवाला हीच ताकद कारणीभूत असल्याचं आता निष्ठावान भाजपकडून सांगितलं जाऊ लागलं आहे. नगरवासियांना देखील विखे यांच्या या ताकदीचा प्रयोग खटकला आणि नगर शहरातील दीड लाखाचं मताधिक्याचं टार्गेट थेट एक लाखावर आलं, असं निरीक्षण निष्ठावान भाजपकडून आता नोंदवलं जाऊ लागलं आहे. विखे यांनी ही ताकद थेट पुढं आणण्यापेक्षा पडद्यामागे ठेवली असती तर, नगरमधील लीडमध्ये फरक पडला असता आणि आताचा निकाल वेगळा असता, असे सांगितले जात आहे.

Sujay Vikhe Shivaji Kardile Sangram Jagtap Sandeep Kotkar
Ahmednagar Constituency Lok Sabha Election Result : नगरमध्ये विखेंना 33 वर्षांनी पवारांनी अद्दल घडवली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com