Agitation For Sugarcane Rate : 'प्रहार'चा दणका; शेतकऱ्यांना 18 टक्के व्याजासह मिळणार थकीत पेमेंट

Agitation For Sugarcane Rate In Ahmednagar : प्रादेशिक साखर कार्यालयाने तक्रार शेतकरी वगळून कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची बैठक घेऊन 31 मे रोजीपर्यंत शेतकऱ्यांचे थकीत 149 कोटी रुपयांचे पेमेंट जमा करण्याचे लेखी घेतले. यावरून प्रहार संघटनेने आक्रमक होत आंदोलन केले.
Agitation For Sugarcane Rate
Agitation For Sugarcane Ratesarkarnama
Published on
Updated on

Nagar News : नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना 'प्रहार'ने दणका दिला आहे. शेतकऱ्यांचे कारखान्यांकडे थकीत ऊस पेमेंट (Sugarcane Payment) 18 टक्के व्याजासह मिळणार आहे. प्रहार संघटनेने यासंदर्भात नगरच्या प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात मुक्काम आणि ठिय्या आंदोलन केले.

नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Growers) वेळेत पैसे मिळत नसल्याचा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आला होता. यावर प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने चुकीचे उत्तर दिल्याचा आरोप करत 'प्रहार'चे (Prahar) जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.

नगरमधील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात प्रहार संघटनेने शेतकऱ्यांसह (Farmer) मुक्काम आणि ठिय्या आंदोलन केले. बाळासाहेब खर्जुले, ज्ञानेश्वर सांगळे, आप्पासाहेब ढूस, जालिंदर आरगडे यांच्यासह शेतकरी आंदोलनात होते.

या आंदोलनापूर्वीच प्रादेशिक साखर कार्यालयाने कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांची बैठक घेऊन 31 मे रोजी पर्यंत शेतकऱ्यांचे थकीत 149 कोटी रुपयांचे पेमेंट जमा करण्याचे लेखी घेतले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Agitation For Sugarcane Rate
MLC Election 2024 : विधान परिषदेची निवडणूक शिक्षकांच्या हातून निसटली, आता रंगणार राजकीय आखाडा?

अभिजीत पोटे यांनी यावर आक्रमक होत, हे थकीत पेमेंट व्याजासह जमा करण्याची मागणीचे पत्र होते, त्यानुसार जमा व्हायला पाहिजे, अशी भूमिका घेतली. प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाने परस्पर कारखानदारांची बैठक घेतली.

या बैठकीला तक्रारदार प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांना का बोलावले नाही? अशी विचारणा केली. प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाकडून कारखानदारांना पाठिशी घातले जात आहे का? असा आरोप आंदोलकांनी केला.

प्रादेशिक सहसंचालक गणेश पुरी आणि उपसंचालक शुभांगी गाडे यांनी प्रहारच्या आंदोलकांना थकीत पेमेंट व्याजासह जमा होणार असल्याचे लेखी पत्र दिले. यानंतर अभिजीत पोटे यांनी आंदोलन मागे घेतले. कारखानदारांकडून शेतकऱ्यांची नेहमीच फसवणूक होते.

याबाबत जिल्हा प्रशासनापासून ते सहकारी मंत्र्यांपर्यंत तक्रारी झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यात कारखानदारांनी नेहमीच संघर्ष ठेवला आहे. आम्ही संघर्षाला घाबरत नाही. शेतकरी संघर्षावर ठाम राहिल्यास काय होईल आणि त्याचे परिणाम भोगायला तयार रह, असा इशारा अभिजीत पोटे यांनी दिला.

Agitation For Sugarcane Rate
Milk Subsidy : मोठा दिलासा, 91 हजार दूध उत्पादकांना 76 कोटींचे अनुदान...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com